
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारे भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी वंदनीय श्री नमोजी यांच्याशी संवाद साधला. वंदनीय नमोजी कुठल्याही यंत्रणेशिवाय कुणाशीही संपर्क साधू शकतात. इंडियन स्टँडर्ड टाइम अमूक अमूक वाजता प्रत्यक्ष नमोजी आपल्याशी संवाद साधणार असल्याने अंतराळ स्थानकातील ‘वाय फाय’ चालू ठेवावे, अशी सूचना पृथ्वीवरुन करण्यात आल्यानंतर श्रीयुत शुभांशु शुक्ला यांनी घाईघाईने अंतराळस्थानकातच एक बरीशी मोकळी भिंत बघून तेथे काही तोरणे टांगली आणि तिरंग्याची पार्श्वभूमी तयार करुन संवादासाठी ते तयार झाले.