dhing tang
sakal
काहीही काय वाचता, अनाकोंड्याची गोष्ट सांगू? ऐका तर मग : प्राणीशास्त्रात आम्ही बऱ्यापैकी गती आणि लौकिक मिळवला आहे, हे फार थोड्या लोकांना माहीत असेल. लहानपणापासूनच आम्ही प्राणीविश्वाचे चाहते आहोत. इतके की आमचे कुटुंबीय आम्हांस अनेक वर्षे चतुष्पाद असल्याप्रमाणेच वागवत असत. प्राणीजगताची खबर ठेवण्यासाठी आम्हाला देशोदेशीच्या जंगलात जावे लागते.