

Bihar Politics Through Lighter Lens
Sakal
पाटण्यातील गांधी मैदान गर्दीने फुलून गेले होते. नितीशजी दहाव्यांदा शपथ घ्यायला उभे होते. मंचासमोरच्या विस्तीर्ण व्हीआयपी विभागात अनेक सोफे ठेवलेले. त्या सोफ्यावर यशस्वी अतिथी आसनस्थ होते. त्यातील एका सोफ्यावरील सुसंवाद:
नानासाहेब : (मंचाकडे बघत) काय बघताय इतकं टक लावून?
भाईसाहेब : (अनिमिष नेत्रांनी…) नितीशजींनी दहादा शपथा घेतल्या! दहादा!! आम्ही एकदाच!!
नानासाहेब : मी सिनीअर आहे तुम्हाला! माझ्या झाल्या, तीन-चार!!
भाईसाहेब : (बोटं मोडत) पहाटेची धरुन!! (विलक्षण सन्नाटा…)
नानासाहेब : (कौतुकानं) नितीशजींची गाडी जोरात आहे…! मोदीजींना वाकवाकून सांगत होते, ‘‘आप है, इसलिए बिहार है!’’