narendra modi
sakal
स्थळ : ७, लोक कल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वखत : बप्पोरे.
बंगल्याच्या प्रशस्त हिरवळीवर डझनभर दिल्लीचे मोर उन्हात उभे आहेत. ही स्वतंत्र प्रजाती आहे. रंगारंग कार्यक्रमाच्या वेळी पुढला आयटम आपलाच आहे, या तणावाखाली विंगेत ताटकळणाऱ्या समूह नृत्यातील कलावंतांची कळा त्यांच्या पिसाऱ्यावर आहे. जाम टेन्शन आहे. बंगल्याच्या पायऱ्यांवर मोटाभाई हातात मिठाईचा बोक्स घेऊन तितकेच ताटकळत उभे आहेत. साक्षात नमोजीभाई मोरांना दाणे खिलवत आहेत. अब आगे...