ढिंग टांग : दिल्ली का बुलावा..!

दिल्लीच्या संभाव्य बदलीच्या अफवांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; नमोजी परदेशात असताना ‘कब आ रहे हो दिल्ली?’च्या प्रश्नांनी काळजाचा ठोका चुकला
Through satire, the article reflects on Maharashtra politics, power equations, and the culture of political speculation.

Through satire, the article reflects on Maharashtra politics, power equations, and the culture of political speculation.

Satire

Updated on

आजची तिथी : श्री पराभव नाम संवत्सर श्रीशके १९४८ ज्येष्ठ अष्टमी.

आजचा वार : ट्यूसडेवार

आजचा सुविचार : चलो बुलावा आया है, मोटा(भाई)ने बुलाया है..!

नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः (१०८ वेळा लिहिणे) शहाण्या राजकारण्याने वेळीअवेळी दिल्लीला येऊ नये. पण मी स्वभावाने भोळाभाबडा असल्यामुळे ‘नर्मदा प्रकल्पाची अर्जंट मीटिंग आहे, त्वरित यावे’ असा निरोप मिळाल्यामुळे तातडीने दिल्लीला आलो. मीटिंगला दांडी मारली असती तर बरे झाले असते, असे आता वाटू लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com