धर्माच्या आधाराची अनोखी देणगी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Article

धर्माच्या आधाराची अनोखी देणगी!

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

प्रथा-परंपरांच्या पूर्वार्धामध्ये आपण पावसाळ्यात येणारा चातुर्मास, मासिक पाळी या दोन्ही गोष्टींना आपल्या पूर्वजांनी पुरेपूर सकारात्मकतेने धर्माच्या कॅप्सूलमध्ये टाकत पिढ्यान् पिढ्यांसाठी देणगी दिली आहे. आजही आपण ती व्यवस्थितपणे पाळत आहोत. एखादी गोष्ट नाही सांगितली तर नेमकी तिच करणे या आपल्या मानसिकता जाणून असलेल्या पूर्वजांनी या बाबी व्यवस्थितपणे हाताळल्या आहेत. गरज आहे त्यातली सकारात्मकता समजून घेण्याची...

पूर्वार्धामध्ये आपण मासिक पाळीबद्दल समजून घेत होतो, तोच भाग आपण पुढे सुरू करूया. अर्थात, आता त्यामागील शास्रीय कारणे काय आहेत यापासून. दर महिन्याला येणारी स्त्रियांची मासिक पाळी सुरू झाल्यापासून ती बंद होईपर्यंत दर महिन्याला पाळी आली, की चार दिवस त्या स्त्रीला बाजूला बसविले जाते. खरंतर ही मासिक पाळी म्हणजे ईश्वराने स्त्रीला दिलेले वरदानच आहे. जर मासिक पाळी नसती, तर आपल्या पुढच्या पिढ्या दिसल्या असत्या का? ते जाऊ द्या. आपणही स्वतः दिसलो असतो का? नाही ना? आणि हे आपणा सर्वांनाही माहीत आहेच. आपण आता साध्या, सरळ, सोप्या भाषेत मासिक पाळीबद्दल समजून घेऊया. जेव्हा कुठल्याही स्त्रीला गर्भधारणा होते, तेव्हा जे काही बाळ मोठे होते, ते काही आपोआप होते का? हवेतून होते का? अर्थातच नाही. याबद्दलच आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे आहे. ज्या वेळी मासिक पाळी येते, त्या वेळी आधी तर मागच्या महिन्यातील हिशेब निसर्ग पूर्ण करीत असतो, म्हणजे काय, बघूया. निसर्ग आपले काम किती चोख, काटेकोर, सुंदर रीतीने पार पाडीत असतो. निसर्ग प्रत्येक महिन्याला एक स्त्रीबीज म्हणजेच ओव्हम प्रत्येक स्त्रीमध्ये तयार करीत असतो आणि त्याच वेळी पुरुषांमध्ये वीर्याच्या एका थेंबात कोट्यवधी शुक्रजंतू म्हणजेच स्पर्म्स तयार होत असतात. बघा, निसर्ग किती हिशेबी आहे. ते इकडे कोट्यवधी शुक्रजंतू आणि तिकडे मोजून एकच स्त्रीबीज म्हणजे कितीही प्रयत्न केला, तरी गर्भधारणेची संधी प्रत्येक महिन्याला मोजून एकच असते. स्त्रीबीज पाळीच्या साधारणतः मध्यंतरी निर्माण होत असते. खरंतर हा एक संपूर्णतः मोठा विषय आहे. आपण इथे हा विषय अगदीच तोंडओळख केल्यासारखा समजून घेत आहोत. जसे की स्त्रीबीज पाळीच्या मध्यंतरी तयार होत असते. निसर्ग प्रत्येक महिन्याला गर्भधारणा होणारच आहे, याच हिशेबाने आपल्या तयारीला लागलेला असतो, म्हणून गर्भाशयात पाळीच्या पहिल्या दिवसापासूनच बाळाच्या वाढीसाठी संपूर्णपणे पोषक असे वातावरण, इन्फ्रास्ट्रक्चर निसर्ग तयार करायला लागतो. त्यात मग बाळाचे अस्तर असते, त्याच्या भरणपोषणासाठी योग्य ते अस्तराबरोबरच निर्मिती होत असते. ही निर्मिती स्त्रीबीज तयार होईपर्यंत सुरू असते. स्त्रीबीजाचे आयुष्य मोजून ४८ तासांच्या आसपास असते. त्यादरम्यान जर तिकडून शुक्रजंतू आलेत, तर स्त्रीबीजाचा आणि शुक्रजंतूचा मिलाप होतो आणि गर्भधारणा होते. तोपर्यंत निसर्गाने केलेली तयारी कामाला येते. गर्भाची वाढ सुरू होते. त्यामुळेच तेथून पुढे स्त्री प्रसूत होईपर्यंत परत पाळी येत नाही. केलेली तयारी ही गर्भधारणेकरिता वापरली जाते आणि बाळ गर्भाशयात असेपर्यंत त्याची वाढ करण्याचे काम गर्भाशयाचे असते. त्यामुळे पाळी येत नाही. अन्यथा एकदा स्त्रीबीज ४८ तासांचे होऊन मृत पावले, की निसर्ग ही केलेली तयारी बाहेर टाकून देण्याच्या तयारीला लागतो. जेवढे दिवस तयारीला तेवढेच दिवस आवराआवरीला लागतात आणि एकदा आवराआवरी झाली, की निसर्ग हे सर्व मृत झालेले मटेरियल फेकून देते आणि पुनश्च एकदा येणाऱ्या महिन्यात होणाऱ्या गर्भधारणेची तयारी करायला लागतो. हे चक्र पाळी आल्यापासून तर पाळी बंद होईपर्यंत सुरूच असते आणि मग सांगा यात कुठला आलाय विटाळ?

हेही वाचा: मराठी टक्का घसरला, भाषा बदलली...

हे चक्र जर निसर्गाने बंद केले तर? नवीन मनुष्याची निर्मिती होईल काय? यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, कुठल्याही मुलीला, स्त्रीला पाळी सुरवात झाल्यापासून तर साधारणतः पहिले मूलबाळ, क्वचित प्रसंगी दुसरे मूलबाळ होईपर्यंत, पाळीच्या पहिल्या-दुसऱ्या दिवशी ओटीपोटात भरपूर दुखत असते. तिला मानसिक व शारीरिकदृष्ट्या खूप अस्वस्थपणा आलेला असतो. मनानेही ती अस्वस्थ असते. याला वैद्यकीय भाषेमध्ये ‘डिस्मेनोरिया’ असे म्हटले जाते. यात प्रामुख्याने पहिल्या दोन दिवसांत तर तसे बघितले तर चारही दिवस त्या मुलीला, स्त्रीला विश्रांतीची फारच गरज असते. तिला पडून राहावेसे वाटत असते. त्या काळी या सगळ्या सासू, नणंदप्रधान, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कितीही ओरडून सांगितले असते, अरे, नका रे त्रास देऊ त्या कोवळ्या जीवाला, तिला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती घेऊ द्या तिला. औषध द्या. तर कोणी ऐकले असते का? आणि म्हणूनच अत्यंत सकारात्मकतेने आपल्या पूर्वजांनी या मानवी जीवन तयार होण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला बेमालूमपणे धर्माच्या आवरणामध्ये कॅप्सूलमध्ये टाकल्यावर किती सहजपणे आपल्या अनेक पिढ्यांनी ही कॅप्सूल अगदी छानपणे गिळली आहे.

आपण अजून काही प्रथा-परंपरा यांचा सखोल अभ्यास करूया. जैन धर्मातील काही रुढी-परंपरांचा मागोवा घेऊया. जैन धर्मातदेखील चातुर्मासाची संकल्पना बरोबर पावसाळ्यातच राबविली आहे. चातुर्मासाबद्दल सविस्तर विवेचन झालेले आहेच. अशाच अजून काही वेगळ्या परंपरांचा अभ्यास करूया .

पाणी उकळून गार करून पिणे . एवढे चांगले अत्याधुनिक पाण्यासाठी फिल्टर्स वापरत असतांना देखील जर कोणी आजारी पडले तर आजही अनेक रुग्ण हे फिल्टर्स मधून फिल्टर झालेले पाणी उकळून पीत असतात. जसे जसे विज्ञान प्रगत होत गेले तसं तसे संशोधकांच्या लक्षात येत गेले की पिण्याचे पाणी हा आजारांचा फार मोठा स्त्रोत आहे . ज्यांना आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये वॉटर बॉर्न डिसीज असं म्हणतो .जसे की टायफाईड, कावीळ ,गॅस्ट्रो एंट्रायटीस ,कॉलरा इत्यादी इत्यादी हे सर्व वॉटर बॉर्न डिसीज आहेत हे विज्ञानाला लक्षात येण्यासाठी हजारो वर्ष लागून गेलीत जशीजशी प्रगत साधने त्यांना उपलब्ध होत गेली तसं तसं यावरती शिक्का मोर्तब होत गेलं. आणि हेच आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांआधी कुठल्याही प्रकारची साधने हाताशी नसताना कसे बरे त्यांना कळले असेल ? किती हुशार ,दूरदृष्टी ,सकारात्मकता, कुठल्याही गोष्टीला अमलात आणण्याची पद्धत ,मानसशास्त्राचा अभ्यास असलेली आपली पूर्वज मंडळी होती. आपल्या पूर्वजांना एवढे तर नक्कीच कळले होते की पाण्यामध्येच गडबड आहे पाण्यामुळेच बरेचसे आजार होतात आणि त्या काळातील सर्वात चांगला उपाय देखील त्यांनी शोधून काढला. पण कुठलीही गोष्ट आपण मानवांना सरळ सरळ सांगितली तर तो ऐकेल कसला आणि मग छानसा रस्ता या पाणी उकळून गार करून पिण्यासाठी शोधून काढला म्हणजे अर्थातच धर्माची कॅप्सूल .माझी स्वतःची नानी जी म्हणजे माझ्या आईची आई सुरज बाई बाबुलालजी पारख वयाचे बरोबर शतक पूर्ण करून गेल्यात ह्या आमच्या नानीने वयाच्या तीशी पासून ते शेवटपर्यंत म्हणजे बरोबर सत्तर वर्षे पाणी उकळून गार करून पिले. मला लहानपणापासून ते नानी च्या शेवटच्या दिवसापर्यंत नानीला मी कधीही पाण्यापासून होणाऱ्या आजारांनी ग्रस्त झालेले बघितलेले नाही . आणि माझी बाई म्हणजेच आई , ही देखील नानिंच्या पावलावर पाऊल ठेवून गेली चाळीस वर्षे अव्याहतपणे पाणी उकळून गार करून पीत आहे आणि अर्थातच तीदेखील गेल्या चाळीस वर्षात कधीही पाण्यापासून होणाऱ्या आजारांना बळी पडलेली नाही जैन समाजाचे सर्व धर्मगुरु तर पाणी उकळून पितातच सोबत अनेक श्रावक देखील पाणी उकळून गार करून पीत असतात आणि अर्थातच त्यामुळे त्या सर्वांना पाण्यापासून होणाऱ्या आजारांपासून आपोआपच संरक्षण मिळत असते अर्थातच ही किमया पूर्वजांच्या कुठल्याही साधना वीना असलेल्या ज्ञानामुळे तसेच त्यांच्या वैज्ञानिक गोष्टींना धर्माच्या कॅप्सूल मध्ये टाकून सकारात्मकतेने आपल्याला दिल्यामुळे शक्य झाली

हेही वाचा: संकल्प उदात्त परी... बोलके करतील काय!

अशीच जैन धर्मीयांमध्ये अजून एक सुंदर प्रथा आहे ती म्हणजे सूर्यास्ता नंतर जेवण करायचे नाही काहीही खायचे नाही जैन धर्मीय संध्याकाळी सूर्य असेपर्यंतच जेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच तेही उशिरात उशिरा जेवायचं यामध्ये पुण्य मानलं जातं आणि हेच डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि आत्ता आत्ता डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी ह्या गोष्टी आरोग्य करता हे किती उत्तम आहेत हे साधार सिद्ध केलं याच्याने वजन तर कमी होतच आणि त्यामुळे आपोआपच अनेक मधुमेहाच्या रुग्णांच्या शर्करेची पातळी आटोक्यात आली आयुर्वेदा नेही हेच सांगितले जसा सूर्य मावळतीला जातो त्याच पद्धतीने आपली पचन क्षमता देखील संध्याकाळी उशिरा रात्री कमी होत जाते हे झालं विज्ञान परंतु त्यावेळची परिस्थिती ही अजून काही वेगळीच होती त्याकाळी विद्युत पुरवठा हा विषयच नव्हता त्या काळातील घरे ही साधी शक्यतो मातीची छोटी असायची त्यात स्वयंपाक घर हे ही छोटेसेच असायचे विद्युत पुरवठा नसल्याने एकदा दिवस मावळला ही त्यानंतर कंदील किंवा चिमणी किंवा टेंबा असं काहीसं प्रकाशा साठी ची साधने असायची की ज्यांच्या उजेडाला खूप जास्त मर्यादा असायची. मग भाजी मध्ये कुठला एखादा विषारी किडा जसे की पाल इत्यादी पडला तरीही काहीही कळत नसे यामुळेही जीवाला धोका होऊ शकत होता त्याबरोबरच त्यावेळी सूर्य मावळला की गावांमध्ये फार लवकर सामसूम होत असे ज्याला आपण नाईट लाईफ म्हणतो अशी कुठली ही भानगड त्याकाळी शक्यतो नसायची आणि त्यामुळे रात्री उशिरा खाल्लं की लगेच झोपणे हा जवळपास एकच कार्यक्रम असायचा आणि अर्थातच त्याचा परिणाम तब्येतीवर व्हायचा आपल्या पूर्वजांना हे सगळ कुठलीही वैद्यकीय साधना नसताना बरोबर लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी बरोबर या गोष्टींना धर्माच्या कॅप्सूल मध्ये टाकून आज पर्यंत व्यवस्थित दिली आहे जे काम आता विज्ञान करतो आहे. जी जी लोक ह्या गोष्टींचं पालन करतात ,त्यांच्यामध्ये मधुमेहाच , इतर आजारांच देखील प्रमाण लक्षणीयरित्या कमी आहे . आणि हीच गोष्ट आपल्या पूर्वजांनी सरळ सरळ सांगितली असती ! तर ? तर ?

आपण अजून एक अभ्यास करूया तो म्हणजे सणांचा आपण कधी कोणी क्वचितच विचार केला असेल की आपले जे सण आहेत ते कोणत्या दिवशी दिवसांमध्ये यावेत त्या काळी कोणी कसे ठरविले असेल हे कोणी तरी ठरविले असेल एवढे मात्र नक्की कारण जसा मानव उत्क्रांतीतून निर्माण झाला तशी काही सण वारांची निर्मिती उत्क्रांतीतून झाली नाही हेही तेवढेच नक्की. ही सगळी सण वार आपल्या पूर्वजांनी कुठल्या विशिष्ट दिवसांमध्ये करायचे हे त्याबरोबरच त्या त्या सणा वाराला कुठल्या प्रकारचे गोड-धोड करायचे कुठल्या कुठल्या पूजा करायच्यात घर कसे सजवायचे आपला पोशाख कसा असावा अशा अगदी बारीक-सारीक गोष्टी कशा करायच्या याचा संपूर्ण अभ्यासपूर्ण अर्थातच आपण चर्चा करीत असलेलं वेगवेगळे विज्ञान त्यात समाविष्ट करून आपल्याला प्रथा परंपरेच्या रूपात ही सण वार आखून दिलेली आहेत जी सगळी आपण आजही साजरी करीत असतो. आधी आपण ह्या सणा वारं वरती एक नजर टाकूया मराठी वर्षाप्रमाणे आपण ही यादी बघूया

गुढीपाडवा, रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्री, दीपावली ,मकर संक्रांत ,

होळी इत्यादी इत्यादी आपण या यादीमध्ये मोठे मोठे सण घेतलेली आहेत यातील एखाद-दुसऱ्या सणावरती प्रातिनिधिक स्वरूपात नजर टाकूया अभ्यास करूया म्हणजे आपण सर्वांच्या लक्षात प्रत्येक सणाबद्दल आपोआप येईलच

यातील मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे ज्याला आपण सणांचा राजा म्हणतो तो म्हणजेच दीपावली . आता हा कधी येतो हे खूपच महत्वपूर्ण आहे यामध्ये पूर्वजांची दूरदृष्टी सगळ्या प्रकारच्या विज्ञानांचा त्यांचा अभ्यास हे सर्व आपल्या लक्षात येईल हा सण पावसाळा बरोबर संपल्यावरती येतो ज्यावेळी शेत शिवारा मधली खरीपाची पिके कापून झालेली असतात शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे आलेले असतात आणि आपण आजही आपला देश शेतीप्रधान म्हणतो त्यावेळी तर आजच्या पेक्षाही किती तरी जास्त पट लोकं शेती वरती अवलंबून होते खरिपाचा हंगाम संपून शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे असावयाचे/ असतात वातावरण अगदी स्वच्छ सुंदर असते हिवाळ्याची सुरुवात व्हायची असते.ना तर जास्त उन, ना तर जास्त थंडी आणि पावसाळा तर संपलेलाच असतो. असे स्वच्छ सुंदर वातावरण यावेळी असते . त्या काळी पडत असलेल्या जोरदार पर्जन्यमानामुळे मातीची घरे लवकर गळायला लागायची त्यामुळे घराच्या भिंतींना ओलावा येऊन बुरशी पकडीत असे घराघरांमध्ये कुंद असे वातावरण राहत असे जे की आरोग्यासाठी घातक असायचे अन हेल्दी एन्व्हायरमेंट असे ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आणि मग दीपावलीच्या निमित्ताने छानशी रंग रंगोटी घराघरांमध्ये केली जाते. ज्याच्याने घर घरातील वातावरण सुंदर तर बनतेच सोबत आरोग्यदायी ही बनते कारण रंग दिल्यामुळे पेस्ट कंट्रोल ही आपोआपच होऊन जात असे . रंग रंगोटी पासून आकाश कंदील पासून फटाकडे पासून सर्व गोष्टींची तयारी ही जोरात असते घरातील प्रत्येक व्यक्तीला नवीन कपडे केले जातात अनेक घरांमध्ये नवीन वाहने नवनवीन गोष्टींची खरेदी केली जाते . थोडक्यात काय आपण जर नीट विचार केला तर संपूर्ण समाजाचा अर्थकारण जे की एकमेकांवर अवलंबून असते पण ज्याची खरी सुरुवात त्याकाळी शेतीपासून होत असे ते अर्थ कारण खूप जोरात फिरायला लागायचे या निमित्ताने अनेक लोकांना कामधंदा देखील मिळायचा जसे की रंग काम करणारे ,साफ सफाई करणारे ,फटाकडे बनविणारे ,त्यांचा व्यापार करणारे. किराणा मालाचा धंदा तर सगळ्यात जोरात चाललेला असायचा आणि आजही चाललेला असतो. कपड्यांच्या व्यापारापासून तर कपडे शिवणाऱ्या शिंप्या पर्यंत. पूजा सांगणारे भटजी असे कितीतरी उदाहरणे देता येतील ह्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी देखील जोपासली जावयाची . भाऊ बिजेच्या निमित्तानं बहीण भावांची भेट व्हायची. भाऊबीजेला लेक बहिण माहेरी यावयाची. दीपावलीच्या निमित्त अनेक प्रकारच्या पूजा अर्चा होतात. त्यातून सगळ्यांना मन शांती मिळून पुढे जाण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. असा हा प्रकाशाचा पर्व असलेला दीपावलीचा सण. एव्हाना वरील विवेचनावरून आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षात आले असेल की आपले पूर्वज किती हुशार किती दूरदृष्टी असलेले काळाची पावले ओळखणारे आरोग्याची चिंता वाहणारे आपल्या कामाची हिताची गोष्ट बरोबर धर्म रूढी परंपरेच्या कॅप्सूल मध्ये अत्यंत सकारात्मक टाकत होते यात काहीच शंका नसावी... किती विचार पूर्वक यांनी दीपावली साठी दिवस निवडले किती विचारपूर्वक दिवाळीतील आठवडाभर वेगवेगळ्या पूजा अर्चा, वेग वेगळे कार्यक्रम ,किती सुंदर विचारपूर्वक सर्व काही योग्य ठिकाणी योग्य वेळी बसविलेले म्हणजेच प्रकाश पर्व दीपावली.

हेही वाचा: मानाचा मुजरा...मनापासून

आता एक छोटसा पण अत्यंत वेगळा पूर्वजांच्या दूरदृष्टीची सकारात्मकतेची साक्ष देणारा विषय घेऊ या लग्नांचे मुहूर्त . मी जेव्हा या विषयांमध्ये सखोल अभ्यास करायला लागलो त्यावेळी मला खरोखरच खूप आश्चर्य वाटायला लागले की खरोखरच सलाम आहे आपल्या पूर्वजांना त्यांच्या दूरदृष्टीला त्यांच्या सकारात्मकतेला . सगळ्यात पहिले त्यांनी विचार केला असेल तो म्हणजे अर्थ शास्त्राचा की कोण कोणत्या वेळी लोकांकडे पैसा असणार आहे त्यानंतर त्यांनी विचार केला असणार म्हणजे त्यावेळी आणि आजही ज्याच्या वरती आज आपले जीवनमान अवलंबून आहे ते म्हणजे शेती आणि शेतीतील पीक पाणी. ज्या ज्या वेळी पीक पाणी हातात आलेले असेल ज्या वेळी शेतात फारशी कामे नसतील बरोबर त्या त्या वेळी येणारे मुहूर्त. ज्या वेळी वातावरण स्वच्छ सुंदर असेल ती वेळ मुहूर्त आणि त्या मुळेच आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या हवामानामध्ये आपल्याला वेगवेगळे मुहूर्त सापडतील या विषयाला आपण थोडे समजून घेऊ या जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये दीपावलीच्या पंधरा दिवसानंतर साधारणता लग्नकार्य तुलसी विवाह पासून सुरू होतात अंदाजे महिना-दोन महिने ते मुहूर्त चालतात रब्बी हंगामाचे पीक पाणी काढायची वेळ येते आणि बरोबर लग्नाचे मुहूर्त बंद होतात. एकदा पीक पाणी काढून झाले की बरोबर दोन अडीच महिने लग्नकार्य चालतात. आणि एकदा की पावसाळा सुरू झाला मुहूर्त बंद हे झाले महाराष्ट्रातील हेच आपण उत्तरेला किंवा उत्तर पूर्व राज्यांमध्ये जाऊया जसे की कश्मीर लद्दाख सिक्किम थोडक्यात जेथे-जेथे साधारणता ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत बर्फ पडतो तेथे कुठेही या महिन्यांमध्ये लग्नाचे मुहूर्त नसतात लग्नच काय इतर कुठल्याही महत्त्वाच्या कामांचे मुहूर्त नसतात कारण तिथे ज्या वेळेला बर्फ पडत असतो त्यावेळी तिथले जीवनमान देखील बऱ्या पैकी गोठलेले असते कुठल्याही प्रकारच्या सेवा मिळणं या काळामध्ये दुरापास्त असते आणि आपल्याकडे मात्र ह्याच दिवसांमध्ये खूप छान मुहूर्त असतात बघा हा विरोधाभास हेच आपण जसजसं दक्षिणेकडे सरकू तसा आपल्या इथल्या पेक्षा हे मुहूर्त काहीसे लवकर सापडतील एवढं नक्की आणि हेच आपण जसं जसे उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे सरकायला लागू त्यावेळेला आपल्याला आढळून येईल किं आपल्यापेक्षा इथले मुहूर्त उशीरा सापडतील म्हणजेच थोडक्यात काय त्याकाळी त्या त्या प्रदेशां मधले हवामान, पाऊस पाणी, पीक काढण्याची वेळ तेथील भौगोलिक परिस्थिती अशा अनेक बारीकसारीक गोष्टींचा आपल्या पूर्वजांनी अत्यंत सकारात्मक पणे विचारपूर्वक हे मुहूर्त लावून दिले आहेत एवढे नक्की

अशाच एका अत्यंत छोट्या पण त्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रथे बद्दल विचार करू या जुन्या काळी म्हणजे फार जुन्या नव्हे तर अगदी आत्ता आत्तापर्यंत म्हणजे चाळीस पन्नास वर्षे अगोदर पर्यंत जर कोणी घरातून बाहेर जात असेल किंवा घरात बाहेरून येत असेल त्या त्या वेळी त्याच्या हातावर एक गुळाचा खडा ठेवायचे आणि सोबत पाण्याचा तांब्या भरून देत असे जाताना जो गुळाचा खडा दिला जायचा त्याला जैनांन मध्ये मंगलिक असं म्हणायचे म्हणतात. काय असेल बरे ही प्रथा ! अतिशय सोप्प आहे जाताना किंवा येताना त्याला एनर्जी सोबत हायड्रेशन दिले जाते जेणेकरून बाहेर कुठेही कामाला जाताना एनर्जी कमी पडू नये आणि बाहेरून येत असेल तर त्याचा आलेला थकवा निघून जावा कारण जुन्या काळी आजच्या एवढ्या खाण पानाच्या एवढ्या सुविधा नक्कीच उपलब्ध नव्हत्या एवड्या हॉटेल्स नव्हत्या म्हणून आपल्या पूर्वजांनी घेतलेली ही काळजी जिला रूढी प्रथे मध्ये टाकून दिलं .. तेही अगदी सकारात्मकतेने

हेही वाचा: दिग्गजांचं वास्तव्य आणि सृष्टिसौंदर्य !

असे आपण आपल्या देशाच्या कुठल्याही राज्यांमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये त्यांच्या प्रथा रूढी परंपरा यांच्यात डोकावून बघितले तर आपणा सर्वांच्या लक्षात नक्कीच येईल की त्याकाळी आपल्या पूर्वजांनी अत्यंत अभ्यासपूर्वक सकारात्मकतेने मेडिकल सायन्स सोशल सायन्स जिऑग्राफिकल सायन्स ह्यूमन सायकॉलॉजी अशा अनेक गोष्टींचा समावेश रूढी-परंपरा मध्ये करून त्यांना धर्माच्या कॅप्सूल च आवरण देऊन आपल्याला जास्तीत जास्त सगळ्या अर्थाने निरोगी ठेवण्याचा सकारात्मक प्रयत्न केलेला आहे . गरज आहे ती या सगळ्या गोष्टींचा डोळे उघडून अभ्यास करण्याचा, त्यातले मर्म समजून घेऊन त्यानुसार आपण चाललो पाहिजे ,ना की त्या गोष्टींचे अवडंबर करून पूर्वजांचा मूळ उद्देश धुळीला मिळवीता कामा नये..

Web Title: Dr Hemant Ostwal Writes Saptarang Marathi Article On Tradition Ppj97

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :cultureTraditionsaptarang
go to top