संवाद कौशल्य, देहबोलीतून साधा ध्येयप्राप्ती

Ashwini Niharkar, Rekha Mhaske, Preeti Mahajan of WOW Group in Nashik, Dr. While giving information about pebbles to Sandhya Salve, K. C. Pandey.
Ashwini Niharkar, Rekha Mhaske, Preeti Mahajan of WOW Group in Nashik, Dr. While giving information about pebbles to Sandhya Salve, K. C. Pandey.esakal

लेखक : के. सी. पांडे

व्यवसाय असो किंवा नोकरी त्यासाठी तुमच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असायलाच हवे. सादरीकरण कितीही चांगले झाले तरी तुमच्यातील उत्तम संवाद कौशल्य त्यावर ‘चार चाँद’ लावते, म्हणूनच तुमच्याकडे संवाद कौशल्याचे कसब असायलाच हवे. ते अंगी यावे, यासाठी सर्व ते प्रयत्न तुम्ही करायलाच हवेत. अगदी तुमचा छंद जोपासायचा असेल तरी... गारगोटी संग्रहालय उभे करण्यासाठी देश-विदेशात भटकताना मला या संवाद कौशल्याचा खूप उपयोग झाला, असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. (saptarang Latest Marathi Article by KC Pandey on Gargoti nashik news)

Ashwini Niharkar, Rekha Mhaske, Preeti Mahajan of WOW Group in Nashik, Dr. While giving information about pebbles to Sandhya Salve, K. C. Pandey.
एक अन्याय होता होता वाचला

आपला श्वास सुरू आहे, तोपर्यंत आपल्या जीवनात निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे आपल्या मनातील विचार होय. प्रत्येकाच्या मनात काहीना काही विचार नेहमीच सुरू असतात. सर्व प्रकारचे विचार आपल्या मनात येत असतात, त्यातले काही चांगले असतात, तर काही वाईटही असतात. पण काय ठेवायचे व काय सोडून द्यायचे हे आपण ठरविणे आवश्यक आहे. विचार मनात येणे आणि ते प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तींसमोर मांडणे तेही त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत. यालाच उत्कृष्ट प्रकारचे संवाद कौशल्य म्हणतात. त्याचबरोबर संवाद साधताना आपण नुसते मुखाद्वारे बोलत नाही, तर त्याबरोबर आपले शरीरही बोलते, त्यास देहबोली म्हणतात.

म्हणजेच इंग्रजीमध्ये ‘बॉडी लँग्वेज’ असे म्हणतो. परिणामकारक संवाद साधण्यासाठी संवाद कौशल्य व देहबोली असणे आवश्यक आहे. गारगोटीसारखा जगातील आगळावेगळा छंद जोपासून व्यवसाय करीत असताना निरनिराळ्या देशांमध्ये मी संवाद कौशल्य म्हणजेच ‘कम्युनिकेशन स्किल’ ही कला अवगत केली. नेव्हीमध्ये कार्यरत असतानाही माझ्याकडे संवाद कौशल्याची कला काही प्रमाणात उपजतच होती, पुढे मी त्यात अनुभवाने व प्रॅक्टिसने अधिक पारंगत झालो. आंतरराष्ट्रीय जगाच्या पटलावर आपण जेव्हा सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करतो, तेव्हा आपली ‘बॉडी लँग्वेज’ कशी असावी, याची गरज मला प्रामुख्याने जाणवली.

आपण भारतीय तरुण त्या वेळी संवादकौशल्य, बॉडी लँग्वेज यामध्ये इतर देशांतील तरुणांच्या तुलनेत मागे होतो. सर्वप्रथम मी यास प्राधान्य दिले. यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न मी केले. काही बाबी आत्मसात केल्या व त्यात मला यशही मिळाले. गारगोटीच्या आंतरराष्ट्रीय पटलावरच्या प्रवासात माझ्यातील संवाद कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल व देहबोली म्हणजेच ‘बॉडी लँग्वेज’ हे अत्यंत महत्त्वाचे घटक गारगोटीच्या यशामध्ये आहे.

मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधनं, हास्यविनोद ओरडणं, रडणं यासारख्या क्रियांमधून कुठलीतरी प्रतिक्रिया व्यक्त होत असते. या सगळ्या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते. पण कधी शब्दांपेक्षा शरीर भाषेचे विविध घटक अधिक महत्त्वाचे आणि तुलनेने अधिक प्रभावी असतात. त्यातून शब्दविण संवादु या युक्तीप्रमाणे ये ‘हृदयीचे ते हृदय’ भाव पोहोचविणे सहज साध्य होते, हे देहबोलीचे वैशिष्ट्य होय. आपल्या देहबोलीवरून समोरच्या मनातील भावना समजून घेतल्या जातात. त्यावरची योग्य वर्तन प्रक्रिया घडवली जाते व घडत असते.

esakal
Ashwini Niharkar, Rekha Mhaske, Preeti Mahajan of WOW Group in Nashik, Dr. While giving information about pebbles to Sandhya Salve, K. C. Pandey.
तू टिकली लाव...

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या संपर्कात अनेक प्रकारची लोक येतात. त्यांच्याकडून आपल्यावर कळत नकळत संस्कार होत असतात. त्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. यात विशेषत्वाने पालक, नातलग मित्र शिक्षक तर असतातच. पण समाजातील अत्यंत कर्तृत्ववान माणसं, कलावंत, लोकप्रतिनिधींचाही समावेश असतो. प्रत्येक वेळी त्यांच्याशी बोलणं व गप्पा संवाद होतो, असे नाही. केवळ त्यांच्या शरीरभाषेद्वारे व्यक्त होणाऱ्या विलक्षण प्रभावातून आपल्या संस्कार झिरपत जातात.

अगदी जवळची प्रेमाची माणसं समोरच्याला काय अपेक्षित आहे हे ओळखून तात्काळ प्रतिसाद देतात. लहान मुलं अनेकदा पालकांच्या मनाविरुद्ध वागतात, आई पुढे आल्यावर मात्र ती अशी वावरतात, की मूल उगाच आईच्या पुढे पुढे करतात, मात्र आई त्याचीही अनपेक्षित लगेच ओळखते. अनेकदा तर अनोळखी व्यक्तीला बघताक्षणी त्याच्या एकूण क्षमतेचा अंदाज बांधता येतो. यासाठी समोरच्याची देहबोली ओळखण्याची कसब तुमच्यात आले पाहिजे.

मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. कुणी कितीही एकांतप्रिय असला तरी तो बारा महिने २४ तास एकांतवासात राहू शकणार नाही. त्याच्या या वृत्तीमुळे कथा कदाचित कुटुंब व्यवस्था तयार झाली असावी. कुणीतरी बोलावं आपले विचार सांगावे ही अंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवनामध्ये असते. अगदी नवजात जन्माला आलेलं मुलही याला अपवाद नाही. यावरूनच लक्षात येईल, की आपल्या जीवनातील संवाद हा एक अविभाज्य घटक आहे. या संवादाच्या माध्यमातूनच आपण आपल्या व्यवसाय वाढीसाठी प्रत्येकाशी वेगवेगळ्या पद्धतीने परिणामकारक संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो.

esakal
Ashwini Niharkar, Rekha Mhaske, Preeti Mahajan of WOW Group in Nashik, Dr. While giving information about pebbles to Sandhya Salve, K. C. Pandey.
अजूनही नाटक जिवंत आहे!

संवाद साधताना किमान एक व्यक्ती बोलणारी व एक ऐकणारी अशा किमान दोघांची गरज असते. बोलणाऱ्या व्यक्तीने बोललेले शब्द त्याच्या चेहऱ्यावरचे, भाव हावभाव हे कान-डोळे यांच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोचवले जातात. या सगळ्या गोष्टींच्या समन्वयातून व ऐकणाऱ्याच्या आकलन क्षमतेनुसार तो समजतो.

गारगोटी जशी माझ्यासाठी नवीन शोध होता तसा तो जगातली बऱ्याचशा घटकांनाही तो नवीनच होता. गारगोटी शोधण्यासाठी लागणारे कष्ट गावोगावचा प्रवास यामध्ये कम्युनिकेशन स्किलचा मला फार उपयोग झाला. जगभरात प्रवास करत असताना वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये निरनिराळ्या भाषेची नागरिक गारगोटी संबंधित व्यक्तींना भेटताना कम्युनिकेशन व बॉडी लँग्वेज ही माझी पॉझिटिव्ह असल्यामुळे मला याचा दैनंदिन प्रवासात फार मोठा उपयोग झाला.

सध्याच्या प्रचंड स्पर्धेत प्रचलित व सर्वांनीच बघितलेल्या, अनुभवलेल्या अशा वस्तू व्यावसायिक जीवनात त्याची विक्री करत असताना सुद्धा त्याबद्दलचे वैशिष्ट्य किंमत हे सुद्धा ग्राहकांना संवादद्वारे वारंवार पटवून द्यावे लागते. खूप कमी लोकांना माहीत असलेली गारगोटीची मार्केटिंग करताना मला किती त्रास झाला असेल याचा अंदाजसुद्धा करता येत नाही. पण मी अविश्वसनीय उद्दिष्ट प्राप्त करण्याची मनाशी खूणगाठ बांधली होती. मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले, तरी मी ध्येयापासून दूर गेलो नाही.

Ashwini Niharkar, Rekha Mhaske, Preeti Mahajan of WOW Group in Nashik, Dr. While giving information about pebbles to Sandhya Salve, K. C. Pandey.
भिडेंची ॲटॉमिक टिकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com