Car Accident : पसरणी घाटात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात; दरीत कोसळून ओडिशा, वाईतील 5 जण जखमी

सुदैवाने ही गाडी झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
Car Accident at Pasarni Ghat Satara
Car Accident at Pasarni Ghat Sataraesakal
Summary

अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही केली.

वाई : पसरणी घाटात (Pasarni Ghat) पर्यटकांना (Tourists) घेऊन जाणारी गाडी रस्त्यावरील मध विक्रेत्यांना धडक देऊन खोल दरीत कोसळली. सुदैवाने ही गाडी झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. काल सकाळी वाई-पाचगणी रस्त्यावर दत्त मंदिराजवळ हा अपघात (Road Accident) झाला.

Car Accident at Pasarni Ghat Satara
Loksabha Election : राज्‍यात 48 पैकी महायुतीचे 45 खासदार निवडून येतील; BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विश्वास

यामध्ये एक मुलगा व दोन महिलांसह पाच जण जखमी झाले. घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, वाईहून पाचगणीच्या दिशेने ओडिशा (Odisha) येथील एका पर्यटकाला घेऊन जाणारी गाडी (एमएच ०१ सीपी ८५९९) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला मध विक्री करणाऱ्या दोघांना धडक देऊन दरीत घुसली आणि एका झाडाला धडकली.

Car Accident at Pasarni Ghat Satara
Raju Shetti : गुऱ्हाळघरे बंद केलीत तर सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल; राजू शेट्टींचा थेट इशारा

त्यामुळे जीवितहानी झाली नाही. गाडीचे मोठे नुकसान झाले. या वेळी रवी रमेश काळे (वय ३६), रूपा रमेश काळे (वय २३) हे मध विक्रेते दांपत्य व त्यांचा मुलगा विक्रम (वय ५, सर्व रा. लाखनगर, वाई), तसेच अंशुमन अखिल पाणीग्रही (वय १४) व ममता साबत (वय ४४, रा. ओडिशा) हे जखमी झाले.

त्यांना तातडीने वाई येथील बेल एअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com