साताऱ्याला मोठा दिलासा! जिल्ह्यात 24 तासात रुग्णसंख्या हजाराने कमी; 38 बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात शिगेला गेलेली लाट आता ओसरू लागल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहे.
corona
coronaesakal

सातारा : सातारा जिल्ह्यात शिगेला गेलेली लाट आता ओसरू लागल्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहे. मुंबई, नागपूर, नाशिकचे आकडे कमालीचे घटू लागले आहेत. मात्र, पुण्याला तितका फरक जाणवत नाही. दरम्यान, जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 880 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Coronavirus) आले असून 38 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. (Corona Test Positive Of 880 Citizens In Satara District)

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 24 (6514), कराड 65 (19589), खंडाळा 39 (8504), खटाव 93 (12218), कोरेगांव 33 (11744),माण 27 (9255), महाबळेश्वर 30 (3739), पाटण 17 (5676), फलटण 240 (18388), सातारा 242 (30843), वाई 60 (10130 ) व इतर 10 (824) असे आज अखेर एकूण 137424 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची, संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 2 (143), कराड 8 (565), खंडाळा 1 (109), खटाव 8 (341), कोरेगांव 6 (280), माण 3 (182), महाबळेश्वर 0 (41), पाटण 0 (141), फलटण 0 (232), सातारा 8 (918), वाई 2 (271) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3223 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

VIDEO पाहा : तौक्ते चक्रीवादळाचा कास, बामणोलीला तडाखा; महाबळेश्वरात 'मुसळधार'

Corona Test Positive Of 880 Citizens In Satara District

corona
चिंताजनक! कऱ्हाडात 25 गावं 'हॉटस्पॉट'; तालुक्‍यात 154 गावांना 'कोरोना'चा विळखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com