esakal | जावळीची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल : सतीश बुद्धे

बोलून बातमी शोधा

जावळीची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल : सतीश बुद्धे}

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका ननावरे, कांबिरे, सावंत, कारंडे, शाम राठोड यांनी परिश्रम घेतले. कांबिरे यांनी आभार मानले.

जावळीची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल : सतीश बुद्धे
sakal_logo
By
विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : जावळी तालुक्‍याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू असून, कृपोषणमुक्तीबरोबर देशाची भावी पिढी सुदृढ व सुसंस्कृत घडवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे गौरवोद्धगार जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी काढले. जावळी पंचायत समितीच्या येथील सभागृहात एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प कार्यालय जावळी (मेढा) यांच्यामार्फत जावळी तालुक्‍यातील सॅम व मॅम मुलांच्या आरोग्य तपासणी शिबिर, पोषण आहार व औषधवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी श्री. बुद्धे बोलत होते. याप्रसंगी जावळी पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी, तहसीलदार राजेंद्र पोळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री शेलार, डॉ. अमृत जाधव, प्रकल्प अधिकारी मानसी सपकाळ, मदतनीस व बालकांच्या माता उपस्थित होत्या.
 
सभापती गिरी, तहसीलदार पोळ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. जाधव यांनी सुमारे 40 मुलांची आरोग्य तपासणी केली. शेलार यांनी कुपोषित बालकांना औषधांचे वाटप केले. दालमिया शुगरच्या आनंद कांबोजी यांनी पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला. आहाराबाबत प्रकल्प अधिकारी मानसी सपकाळ, औषधोपचाराबाबत डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका मनीषा पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका ननावरे, कांबिरे, सावंत, कारंडे, शाम राठोड यांनी परिश्रम घेतले. कांबिरे यांनी आभार मानले.

धमकावून वडापाव नेणा-या गजा मारणेला रात्रीत पोलिसांनी हलविले

शरद पवारांशी पाऊण तासाच्या चर्चेनंतर उदयसिंह पडले बाहेर 

अधिकारी मतदारसंघात माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत सेनेचे आमदार अधिवेशनात आक्रमक

धक्कादायक! शिंगणापूरात चाे-या; ग्रामस्थांत खळबळ

Don't Worry : यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत 

Edited By : Siddharth Latkar