गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात आयसीयू बेड वाढणार, काेणत्या तालुक्यात वाचा

उमेश बांबरे
Friday, 14 August 2020

रुग्णांची ससेहोलपट थांबविण्यासाठी बेडची उपलब्धता तातडीने होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या आरोग्य मंत्र्यांच्या दौऱ्यात काशीळ आणि नवीन औद्योगिक वसाहतीत कोरोना हॉस्पिटल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिलेला होता.

सातारा : कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या दररोज 300 च्या वर गेली आहे. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटरही कमी पडू लागले असून, एकूणच आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलेला आहे. त्यामुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागलेल्या कऱ्हाड व सातारा तालुक्‍यांत आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. लवकरच जिल्हा रुग्णालयात 15 व काशीळ येथे 50 आयसीयू बेडची सोय करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे बेडविना होणारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट थांबणार आहे.
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या वाचा 

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातच कोरोनाची चाचणी जिल्ह्यात होत असल्याने बाधितांचे अहवाल लवकर मिळत आहेत. दररोज 500 ते 600 संशयितांची तपासणी केली जात आहे. त्यातून दररोज 300 च्या वर अहवाल पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढून आता 6751 झाली असून, प्रत्यक्षात 3,444 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढणारी रुग्णसंख्या आणि कमी पडत असलेले बेड आणि व्हेंटिलेटर यामुळे आरोग्य प्रशासनावर ताण येऊ लागला आहे. तसेच ज्या ठिकाणी बेड शिल्लक आहेत, अशा ठिकाणी रुग्ण घेऊन जाताना सर्वांचीच प्रचंड ससेहोलपट होत आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द... जाणून घ्या नवे वेळापत्रक

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा

त्यामुळे ही ससेहोलपट थांबविण्यासाठी बेडची उपलब्धता तातडीने होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या आरोग्य मंत्र्यांच्या दौऱ्यात काशीळ आणि नवीन औद्योगिक वसाहतीत कोरोना हॉस्पिटल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव दिलेला होता. त्यापैकी काशीळ येथे 50 आयसीयूची सोय होणार आहे. तसेच सातारा जिल्हा रुग्णालयात 15 बेडचा आयसीयू नव्याने होत आहे. त्यामुळे लवकरच वाढीव 65 आयसीयूची बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी
 
जिल्हा प्रशासनाने सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांसाठी होम केअरचा निर्णय घेतला. त्याचा फायदा होऊन जिल्ह्यातील आतापर्यंत 300 रुग्णांना होम केअरमध्ये ठेवण्यात आले आहे. परिणामी कोरोना केअर सेंटरवर पडणारा रुग्णांचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे सौम्य व लक्षणेविरहित रुग्णांसाठी होम केअर सेंटर आधार ठरले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचणीसाठी ऍन्टीजेन टेस्टची सोय केलेली आहे. आतापर्यंत दहा हजार रुग्णांच्या ऍन्टीजेन टेस्ट झाल्या असून, त्यापैकी एक हजार सात रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. उर्वरित नागरिकांना घरीच थांबविण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना सेंटर व जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी झाला आहे. 

कोरोनाच्या भीतीने घरगुती औषधांचा सपाटा!, ग्रामीण भागातील स्थिती

राजेश टाेपेंची सिव्हिलला क्लिन चीट; डॉ. अमोद गडीकरांची गच्छंती

  • उपचार सुरू असलेले रुग्ण : 3,444
  • व्हेंटिलेटरची संख्या : 150 
  • कोरोना केअर सेंटरमधील बेड : 2,500 
  • आयसीयू बेडची संख्या : 100 
  • कऱ्हाड, साताऱ्यात : बेड वाढणार 
  • उपचार सुरू असलेली हॉस्पिटल : 27 

कोरेगावातील जलयुक्त शिवारमधील यश मैलाचा दगड, कीर्ती नलावडे 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICU Bed Will Increased In Satara For Covid 19 Patient Treatment