सातारकरांनाे! म्युकरमायकोसिसचा धाेका वाढला; सात मृत्यू

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनप्रमाणे रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्‍शनसाठीही दारोदार फिरावे लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या उपचारांनी मेटाकुटीला आलेले रुग्णांच्या नातेवाइकांचे या आजाराच्या उपचारासाठीही पुन्हा धावाधाव करावी लागत आहे.
Mucormycosis
MucormycosisFile Photo
Summary

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनप्रमाणे रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्‍शनसाठीही दारोदार फिरावे लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या उपचारांनी मेटाकुटीला आलेले रुग्णांच्या नातेवाइकांचे या आजाराच्या उपचारासाठीही पुन्हा धावाधाव करावी लागत आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे mucormycosis साेमवारी ता.24 आणखी दोन बळी गेले. सातारा जिल्ह्यात satara आतापर्यंत 38 जणांना हा आजार झाला असून, त्यातील सात जणांचा बळी गेला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात civil hospital satara 23 रुग्णांवर, कऱ्हाड karad तीन, तर खासगी रुग्णालयात private hospitals 29 जणांवर उपचार सुरू आहेत. दोन रुग्णांचा साेमवारी मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. mucormycosis-death-increased-satara-marathi-news

कोरोनाशी मुकाबला केल्यानंतर काही रुग्णांना बुरशीजन्य अशा म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराने ग्रासले जात आहे. तातडीने उपचार मिळाल्यास त्यावर मात करता येते; परंतु जिल्ह्यामध्ये या आजाराच्या रुग्णांना आवश्‍यक असलेल्या इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिव्हिरनंतर ही इंजेक्‍शनही पुरेशा प्रमाणा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने रुग्णांचा धोका वाढत चालला आहे.

Mucormycosis
चक्रीवादळाचा मेढ्याला जबर तडाखा; शेतीसह 'महावितरण'चं मोठं नुकसान

कोरोना रुग्णाला दिल्या जाणाऱ्या मूळ औषधांमध्ये स्टिरॉईड्‌स व अँटिव्हायरलचा समावेश असतो. परिणामी शरीरातील इन्शुलिनचा स्राव व रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरातील रक्तात वाढलेल्या अतिरिक्त साखरेमुळे कोरोना रुग्णात बुरशी वाढते व रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने ती फोफावते. कोरोना रुग्णांत म्युकरमायकोसिस होण्याचे हे प्रमुख कारण आहे. जादा काळ ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्यामुळे आलेली आर्द्रताही त्याच्या वाढीला कारणीभूत ठरत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेळीच रुग्णालयात दाखल होऊन उपचार केल्यास या रुग्णांवर शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. मात्र, व्याधी झालेली आहे, लक्षणे दिसत आहेत, तरी उपचार न घेतल्यास शस्त्रकिया करावी लागते. त्यानंतर रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र, डोळ्यापर्यंत गेल्यास डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर अंधत्व येऊ शकते. त्याचबरोबर हा आजार मेंदूपर्यंत गेला असेल, तर धोका वाढतो. त्यामुळे वेळीच निदान करून योग्य उपचार होणे हे या व्याधीसाठी अत्यंत आवश्‍यक आहे.

या आजारावरील उपचारासाठी दोन प्रकारची इंजेक्‍शन वापरली जात आहेत. रुग्णाच्या वजनानुसार या इंजेक्‍शनचा तीन ते पाच मिलीपर्यंतचा एक डोस ठरतो. दिवसाला असे पाच ते सहा डोस रुग्णाला द्यावे लागतात. हे डोस रुग्णाच्या प्रकृतीनुसार दहा ते 15 दिवस द्यावे लागतात, अशी या आजाराची परिस्थितीत आहे. त्यामुळे एका रुग्णाला साधारणपणे 50 ते 60 इंजेक्‍शनचे डोस द्यावे लागतात. या इंजेक्‍शनच्या किमतीही कंपनीनुसार बदललेल्या आहेत. साधारणपणे 1,700 पासून सहा हजारांपर्यंत या इंजेक्‍शनच्या किमती आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी हे खर्चिक आहे. त्यासाठी पैसे खर्च करायची तयारी असूनही अनेकांना ही इंजेक्‍शनच उपलब्ध होत नाहीत.

Mucormycosis
हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणा; राजेंचं उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना साकडं
Mucormycosis
VIDEO पाहा : भारीच! गाण्याच्या माध्यमातून जागृती; कोरोनाला रोखण्यासाठी विद्यार्थांचं अनोखं पाऊल

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनप्रमाणे रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्‍शनसाठीही दारोदार फिरावे लागत आहे. अगोदरच कोरोनाच्या उपचारांनी मेटाकुटीला आलेले रुग्णांच्या नातेवाइकांचे या आजाराच्या उपचारासाठीही पुन्हा धावाधाव करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात काही प्रमाणात ही इंजेक्‍शन उपलब्ध होत आहेत; परंतु खासगी रुग्णालयात बिकट अवस्था आहे. त्यामुळे पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी किमान इंजेक्‍शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

अशी आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे..

तीव्र डोकेदुखी

गालावर सूज येणे, बधिरता येणे

डोळ्याच्या आजूबाजूचा, सायनसच्या आजूबाजूचा भाग सुजणे

नाकाच्या भागाला काळसर ठिपके पडणे

टाळू व नाकातील त्वचेचा रंग काळसर होणे

वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे

वरच्या जबड्यातील दात हलणे

जबड्यातील दात पडून पस येणे

नाक बंद पडणे, नाक गळणे, लालसर किंवा काळा स्त्राव येणे

Mucormycosis
काेविडसह म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी 'सिव्हील' सज्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com