esakal | साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक; 'आरोग्य'वर मृत्यूदर कमी करण्याचे 'टार्गेट'

बोलून बातमी शोधा

Corona Virus
साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक; 'आरोग्य'वर मृत्यूदर कमी करण्याचे 'टार्गेट'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बाधित संख्या व मृत्यूदर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील काळात ग्रामस्तरावरील दक्षता समित्या अधिक सजग होणार असून, गावपातळीवर संशयित रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तत्काळ कोरोना चाचणी करण्यास पुढाकार घेणार आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार असल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी यासाठी ग्रामसेवक व सरपंचांशी संवाद साधत उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केल्या आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव सुरू झाला. ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत काही प्रमाणात कोरोनाचा प्रभाव कमी आला होता. मात्र, पुन्हा एकदा जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना अधिक धोकादायक असून, त्यात मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सद्य:स्थितीत शहराबरोबर ग्रामीण भागातील कोरोनाची परिस्थिती भीषण होताना आकडेवारीवरून दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संवाद साधत उपाययोजना राबविण्याबाबत सूचना केल्या आहेत.

माझे लग्न 26 एप्रिलला आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

जिल्ह्यातील अनेक गावे "हॉटस्पॉट' होत कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले असून, ग्रामस्तरावरील दक्षता समितीचे काम अधिक प्रभावी केले जाणार आहे. ग्रामीण भागात अनेक संशयित रुग्णांची चाचणी होत नसल्याचे आढळून येत आहे. परंतु, संशयित रुग्ण बाधित असल्याचे काही घटनांवरून दिसून येते. या रुग्णांनी चाचणी न केल्याने त्यांच्या संपर्कात आलेले बहुतांश नागरिक बाधित झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या "कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग'वरून आढळून आले आहे. त्यामुळे या परिस्थितीला रोखण्यासाठी गावपातळीवरील दक्षता समितींना संशयित रुग्णांची तत्काळ चाचणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. यात मधुमेह व इतर आजार असलेल्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळणार असून, होम आयसोलेशन ठेऊनही रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयातील बाधितांची संख्या कमी होत अत्यावश्‍यक रुग्णांना तत्काळ आयसीयू व ऑक्‍सिजन बेड मिळण्यास मदत होईल.

नाशिक काय घेऊन बसलात, इथं 66 रुग्णांचा जीव धाेक्यात आला हाेता

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या मृत्यूदराला थांबविण्यासाठी ग्रामस्तरावरील दक्षता समित्या अधिक प्रभावी केल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवत संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यावर भर दिला जाणार आहे.

-शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

Corona Virus : कोरोनाच्या धास्तीने नागठाण्यात दहा दिवसांचा कर्फ्यू

खासगी डॉक्‍टरांचे प्रशिक्षण

जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संकटाशी लढा देण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या खासगी डॉक्‍टरांचे आरोग्य केंद्रात प्रशिक्षण होणार आहे. खासगी डॉक्‍टरांकडे रुग्ण तपासणीसाठी आल्यानंतर कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ चाचणी करण्यास प्रवृत्त करणे व इतर उपाययोजना करण्यासाठी दोन दिवसांत प्रशिक्षण देणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सांगितले आहे.

Edited By : Balkrishna Madhale