महाबळेश्‍वर तापले पण कशामुळे ? वाचा सविस्तर

महाबळेश्‍वर तापले पण कशामुळे ? वाचा सविस्तर

महाबळेश्वर,(जि.सातारा) : मुंबईवरून तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आलेल्या त्या 22 जणांमधून आणखी पाच जण, तर गोळेवाडी येथील एक अशा एकूण सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍यातील रुग्णांची संख्या आता बारावर पोचली आहे. कोरोनाची संख्या वाढत चालली असून, ही साखळी खंडित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 
मुंबईवरून विनापरवाना आलेल्या 22 जणांच्या ग्रुपमधील दोन वृद्ध महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. तालुका प्रशासनाने खबरदारी म्हणून या 22 लोकांना प्रारंभीच तळदेव येथिल सेंटरमध्ये क्वारंटाइन केले होते. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आता याच गटातील आणखी पाच जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये कासरुंड येथील दोन, तर देवळी गावच्या तीन जणांचा समावेश आहे. याचबरोबर पाचगणीजवळील गोळेवाडी येथील एका 42 वर्षीय पुरुषाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. महाबळेश्वर तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कासरूड, देवळी, कुमठे आदी गावांतील 22 लोकांचा ग्रुप मुंबईवरून एका ट्रकमधून महाबळेश्वर येथे आला होता. एकत्र प्रवास केल्याने यातील सर्वांनाच कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. हे सर्व प्रशासनाची दिशाभूल करून गावात पोचली होती; परंतु प्रशासनाने या सर्वांना तळदेव येथे हलविले. हा गट कासरूड येथे गेल्याने प्रांताधिकाऱ्यांनी कासरूड गावास कंटेनमेंट झोन लागू केला आहे. त्यामुळे या गावातील कोणालाही गावात प्रवेश करता येणार नाही. अथवा कोणालाही गाव सोडता येणार नाही. अत्यावश्‍यक सेवा पुरविण्याबाबत तालुका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश प्रांताधिकारी यांनी दिलेले आहेत.  

सर्व जण तळदेव सेंटरमध्ये आलेल्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने टप्प्याटप्प्याने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. आजही काही लोकांचे नमुने घेण्यात आले असून, लवकरच या सर्वांचे तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त होणार आहेत. सध्या या गटातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वगळता सर्व जण तळदेव येथील कोरोना सेंटरमध्ये असून, यापासून गावातील ग्रामस्थांना कसलाही धोका नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चिंता करू नये, असे आवाहन तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांनी केले आहे. 

हात धुवायचे की पाणी प्यायचे?, कोरोना प्रतिबंधित वरोशीत पाणीटंचाई

राजस्थानी कनेक्‍शनने बनपुरीकर चिंतेत

जावळीच्या सभापतींकडून गरीबांना माेफत शिवथाळी

क्वारंटाइनमुळे उजळले शाळेचे भाग्य; साबळेवाडीतील कुटुंबियांचे श्रमदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com