esakal | जावळीत कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू : डॉ. भगवान मोहिते

बोलून बातमी शोधा

जावळीत कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू : डॉ. भगवान मोहिते

आघाडीवर काम करणारे कर्मचारी म्हणजे फ्रन्टलाइन वर्कर्सच्या लसीकरणानंतर 45 वयोगटाच्या पुढील सर्वसामान्य जनतेसाठीही लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

जावळीत कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू : डॉ. भगवान मोहिते
sakal_logo
By
महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू असून, उर्वरित नोंदणीकृत नागरिकांनी लसीकरणासाठी तत्परतेने पुढे यावे व त्यांनी तालुक्‍यातील कोणत्याही जवळच्या आरोग्य विभागाच्या लसीकरण केंद्रात जाऊन लवकरात लवकर लस टोचून घ्यावी, असे आवाहन जावळीचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी केले आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राची पाहणी करण्यासाठी आलेले असताना डॉ. मोहिते बोलत होते. ते म्हणाले, ""सर्वच पातळ्यांवर कोरोनावर नियंत्रण करण्याचे काम प्रशासन करत आहे. त्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून लसीकरण सुरू झालेले आहे. आघाडीवर काम करणारे कर्मचारी म्हणजे फ्रन्टलाइन वर्कर्सच्या लसीकरणानंतर 45 वयोगटाच्या पुढील सर्वसामान्य जनतेसाठीही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. नोंदणीकृत लाभार्थींचे लसीकरण सुरू असून ही समाधानकारक बाब असली तरी 100 टक्के लसीकरणासाठी सर्वांना पुढे यावे. 

आरोग्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस झटत असून, प्रबोधन देखील करण्यात येत आहे.'' लस सुरक्षिततेच्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता निर्भयपणे लस टोचून घ्यावी, तसेच मास्क वापरणे, सामाजिक अंतर आणि वारंवार हात धुणे अशी त्रिसूत्रीचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनदेखील डॉ. मोहिते यांनी केले आहे. यावेळी त्यांनी लसीकरणास आलेल्या नागरिकांशी सवांद साधून लशीबाबतच्या सर्व शंकांचे निरसन केले. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर, डॉ. स्वामिनी चव्हाण, श्रीधर कांबळे, आरोग्य कर्मचारी श्री. फरांदे, श्री. झाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

वनाधिकाऱ्यांकडून अपमान; ग्रामस्थांसह महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांत संताप 

ग्रामस्थांनाे! उंब्रजमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, काळजी घ्या

दरोड्यातील संशयित म्हणून त्याला पोलिसांनी पकडला हाेता, पुढे काय घडले वाचा सविस्तर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बेलवडे हवेलीतील युवक ठार

पाटण वन विभागाची दमदार कामगिरी; चार गव्यांना वाचविण्यात यश

Edited By : Siddharth Latkar