esakal | पाटणात गौण खनिज उत्खनन करणाऱ्या खाण मालकांना सहा कोटी दंड; तहसीलदारांची पाच पोकलेन मशिनवरही कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

अनधिकृतपणे खाणीमध्ये गौण खनिज उत्खनावर महसूल विभागाने धडक मोहीम राबवून सात खाण मालकांवर कारवाई करून खाणी सील केल्या होत्या.

पाटणात गौण खनिज उत्खनन करणाऱ्या खाण मालकांना सहा कोटी दंड; तहसीलदारांची पाच पोकलेन मशिनवरही कारवाई

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : अनधिकृतपणे गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तीन खाण मालकांना पाच कोटी 92 लाख 95 हजार 736 रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. धडक कारवाईत सात खाणी व 11 पोकलेन सील केले होते. त्यापैकी तीन खाण मालकांकडे परवाना व रॉयल्टी भरल्याने त्यांचे उत्खनन सुरू झाले आहे. सील केलेल्या 11 पैकी सहा पोकलेनचा उत्खनन परवाना असल्याने ते मुक्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली. 

अनधिकृतपणे खाणीमध्ये गौण खनिज उत्खनावर महसूल विभागाने धडक मोहीम राबवून सात खाण मालकांवर कारवाई करून खाणी सील केल्या होत्या. 11 पोकलेन मशिन सील केले होते. अनधिकृत उत्खननासाठी सुनील माथणे यांना दोन कोटी 29 लाख सहा हजार, दादासाहेब माथणे यांना दोन कोटी, 77 हजार 200 व रामदास कदम यांना एक कोटी 63 लाख 12 हजार 536 असा एकूण पाच कोटी 92 लाख 95 हजार 736 रुपयांच्या दंडाची नोटीस देण्यात आली आहे. दंड रक्कम भरणा करेपर्यंत या तीन खाण मालकांना उत्खनन करता येणार नाही. सचिन पवार यांच्या खाणीवर कऱ्हाड तहसीलदार यांच्या आदेशाने दंड आकारण्यात आला आहे. 

ग्रामपंचायतीत माहिती अधिकाराचा अर्ज का दिला म्हणून सरपंचाकडून ग्रामस्थाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण

सचिन पवार यांनी रॉयल्टी भरली असून, त्यांच्यावर कऱ्हाड तहसीलदारांनी केलेली दंडाची आकारणी जमा केल्याशिवाय त्यांना उत्खनन करता येणार नाही. धडक कारवाईत 11 पोकलेन मशिन सील केली होती. त्यापैकी सहा मशिन मालकांकडे रीतसर परवाना व रॉयल्टी भरून उत्खनन सुरू असल्याने ती मशिन मुक्त केली आहेत. सुनील माथणे यांची दोन व रामदास कदम यांची तीन अशी पाच मशिन दंडाची कारवाई केल्याने मुक्त केलेली नाहीत, असे श्री. टोंपे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर MH11-MH50 वाहनांना टोलमाफी द्या : आमदार शशिकांत शिंदे

गंभीर परिस्थिती! साताऱ्यात रक्ताचा तुटवडा; जिल्ह्याला दररोज 100 बाटल्यांची गरज

वाह, क्या बात है! बहुल्यात शेतकऱ्यांनी बांधले तब्बल 41 बंधारे; 68 विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top