esakal | कडक सॅल्यूट! गोडोली तलावात बुडणाऱ्या महिलेचे साताऱ्यातल्या जांबाज पोलिसांनी वाचवले प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

गोडोली तळ्यात बुडणाऱ्या महिलेचे गोडोली चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राण वाचवले.

कडक सॅल्यूट! गोडोली तलावात बुडणाऱ्या महिलेचे साताऱ्यातल्या जांबाज पोलिसांनी वाचवले प्राण

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : गोडोली तळ्यात बुडणाऱ्या महिलेचे गोडोली चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राण वाचवले. गोडोली पोलिस चौकीमध्ये ता. 7 रोजी रात्री अकराच्या सुमारास गुन्हे निर्गतीचे काम हवालदार दगडे करताना पोलिस चौकीबाहेर जेवणासाठी चाचाने दिलेला डबा आणण्यासाठी चौकीबाहेर गेले होते. 

त्या वेळी गोडोली पोलिस चौकीशेजारी असणाऱ्या तळ्यामध्ये कोणीतरी बुडून मदतीसाठी धडपडत असल्याचे व गटांगळ्या खात असल्याचे दगडे यांना दिसले. त्यांनी तत्काळ चौकी अंमलदार पोलिस हवालदार जाधव व होमगार्ड सूर्यवंशी यांना माहिती दिली. दरम्यान, याठिकाणी कामानिमित्त आलेले सातारा सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. मुल्ला यांनी गोडोली तळ्यामध्ये सुरू असलेली पोलिसांची धावपळ पाहून ते देखील मदतीला धावले. 

जिल्ह्यातील टोलनाक्‍यांवर MH11-MH50 वाहनांना टोलमाफी द्या : आमदार शशिकांत शिंदे

होमगार्ड सूर्यवंशी, हवालदार जाधव व पोलिस नाईक दगडे यांच्या मदतीने गटांगळ्या खात असलेल्या महिलेला त्यांनी वेळीच पाण्याबाहेर काढले. या वेळी डॉ. मुल्ला यांनी महिलेची तपासणी करून महिला ठिक असल्याचे सांगितले. या महिलेला पीसीआर नं 1 चे नाईट ड्युटी हवालदार यादव व होमगार्ड यांचेसोबत चालक कोकणी यांनी त्यांचे राहते घरी सुखरूप पोच केले. संबंधित महिलेस जीवदान मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

गंभीर परिस्थिती! साताऱ्यात रक्ताचा तुटवडा; जिल्ह्याला दररोज 100 बाटल्यांची गरज

वाह, क्या बात है! बहुल्यात शेतकऱ्यांनी बांधले तब्बल 41 बंधारे; 68 विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ

कऱ्हाडकर म्हणताहेत अन्यायकारक लॉकडाउन नकोच; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार पुनर्विचाराची मागणी

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top