शेतकऱ्यांची मागणी पुर्ण; 'या' धरणातून उद्या पाणी साेडले जाणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मराठवाडी धरणातील या हंगामातील हे पाचवे आणि शेवटचे आवर्तन असून, नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्‍यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे.

ढेबेवाडी (जि.सातारा) ः मराठवाडी धरणातून शनिवारपासून (ता. 30) वांग नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. या हंगामातील हे पाचवे आणि शेवटचे आवर्तन असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने पत्रकाद्वारे दिली.
 
मराठवाडी धरणात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात 1.05 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील शेतीला धरणातील पाण्याचा उपयोग होतो. या हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आतापर्यंत चार वेळा धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सध्याही नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागल्याने शनिवारी सकाळी दहापासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिहे-कटापूर प्रकल्प उपविभाग क्रमांक पाचचे सहायक अभियंता एन. ए. सुतार यांनी पत्रकाद्वारे सर्व संबंधित विभागांना कळविले आहे.

मराठवाडी धरणातील या हंगामातील हे पाचवे आणि शेवटचे आवर्तन असून, नदीतील पाणीपातळी वाढणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव कुणीही जीव धोक्‍यात घालून नदीपात्र ओलांडू नये, असे आवाहन पत्रकात केले आहे.

सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सुरू करताना शासनाने शंभर वेळा विचार करण्याची जरुरी याबाबत  40 वर्षे प्राथमिक शिक्षण संस्थाचालक म्हणून कार्यरत राहिलेल्या ज्येष्ठाने मांडलेले विचार नक्की वाचा

अध्यक्ष व्हायचे असते तर सहा महिन्यापू्र्वीच झालो असतो : पृथ्वीराज चव्हाण

महाबळेश्‍वर तापले पण कशामुळे ? वाचा सविस्तर

आईच्या पुण्यतिथीची लाखाची मदत मुख्यमंत्री निधीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Water Will Release From Marathwadi Dam On Saturday