Student Day : 'विद्यार्थी दिनी' प्रतापसिंह हायस्कूलमध्ये महामानवाला अभिवादन; समता सैनिक दलानं दिली बाबासाहेबांना मानवंदना

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे काल (मंगळवार) शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा झाला.
Student Day Celebration at Chhatrapati Pratapsingh Maharaj High School
Student Day Celebration at Chhatrapati Pratapsingh Maharaj High Schoolesakal
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यास अभिवादन केल्‍यानंतर समता सैनिक दलाने संचलन केले.

सातारा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) म्‍हणजे संघर्ष. या संघर्षातून विद्यार्थ्याचा हा महामानव झाला आणि त्यांनी देश घडविला. नव्या पिढ्यांसाठी, नवभारतासाठी हा महामानव प्रेरणेचा ऊर्जास्रोत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिन (Student Day 7 November) मोठ्या उत्साहाने साजरा करायला हवा, असे विचार विद्यार्थी दिवस सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले.

येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे काल (मंगळवार) शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी समता सैनिक दलाने बिगूल वाजवून शाळेस तसेच डॉ. आंबेडकर यांना मानवंदना दिली. या वेळी सहायक समाजकल्याण आयुक्त नितीन उबाळे, विद्यार्थी दिवस प्रवर्तक अरुण जावळे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जातपडताळणी विभागाच्या उपायुक्त स्वाती इथापे, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ, भन्ते दीपंकर, प्रवीण धस्के आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Student Day Celebration at Chhatrapati Pratapsingh Maharaj High School
Kiran Mane: "रक्त सळसळायला लागलंय", डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देत किरण मानेंचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी जेवढे शक्य होईल, तेवढे प्रयत्न आपण केले पाहिजेत, असे सांगत प्रा. केशव पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. यानंतर नितीन उबाळे, शबनम मुजावर, मुख्याध्यापक सन्मती देशमाने, प्रवीण धस्के, अरुण पोळ, अरुण जावळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

Student Day Celebration at Chhatrapati Pratapsingh Maharaj High School
Satish Jarkiholi : कर्नाटकातील राजकारणाला वेगळं वळण; सिद्धरामय्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? काँग्रेस हायकमांड घेणार अंतिम निर्णय!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यास अभिवादन केल्‍यानंतर समता सैनिक दलाने संचलन केले. एक वही एक पेन या अभियानालाही प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास आकाश कांबळे, यशपाल बनसोडे, योगेश म्हस्के, किरण कांबळे, विलासराव कांबळे, अजित जगताप, विजय मांडके, रमेश रत्नाकर आदी मान्यवरांसह राज्‍यभरातील आंबेडकर अनुयायी उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com