Khambatki Ghat : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; रस्त्यावर गाड्यांच्या लांबलचक रांगा

दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद असल्यामुळे या घाटाची वाहतूक पूर्णपणे जाम (Traffic Jam) झाली आहे.
Traffic jam at Khambatki Ghat
Traffic jam at Khambatki Ghatesakal
Summary

रस्त्यावर ट्रक बंद पडून घाट जाम होण्याची ही घटना नवीन नाहीये.

खंडाळा : पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Satara National Highway) खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) आज शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर गाड्यांची संख्या अधिक आहे. तसेच घाटातील सहाव्या वळणावरील दत्त मंदिराजवळ माल वाहतूक ट्रक बंद असल्यामुळे या घाटाची वाहतूक पूर्णपणे जाम (Traffic Jam) झाली आहे.

हा घाट आज सकाळी १० वाजल्यापासून जाम आहे. सातारा-लोणंद रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे जड आणि मोठी वाहने राष्ट्रीय महामार्गाकडे वळवल्याने या घाटात गाड्यांची गर्दी पहायला मिळत आहे. रस्त्यावर ट्रक बंद पडून घाट जाम होण्याची ही घटना नवीन नाहीये.

Traffic jam at Khambatki Ghat
Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

अनेकवेळा वाहतूक महामार्ग पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास स्वतःच्या मालकीची क्रेन उपलब्ध करण्याची मागणी केली असतानाही, अद्यापही क्रेन उपलब्ध झाली नाही. यामुळे अशा गाड्या रस्त्यावर बंद पडून वारंवार घाट जाम होताना दिसत आहे. अद्यापही वेळे (ता. वाई) येथे महामार्गावर दोन ट्रक बंद अवस्थेत उभे आहेत.

Traffic jam at Khambatki Ghat
महाराष्ट्रात लोकसभेत 45 खासदार अन् विधानसभेत 225 आमदार निवडून येतील; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

तर, बोगद्याच्या पलीकडेही एक ट्रक रस्त्यावरच बंद अवस्थेत उभा आहे. तरी, वाहतूक महामार्ग पोलिसांना क्रेन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक वाहनचालकांनी व्यक्त केले. या ठिकाणी वाहतूक पोलीस तात्या फरांदे व महामार्ग पोलीस वहातुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Traffic jam at Khambatki Ghat
धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com