esakal | आगाशिवनगर येथील युवकाच्या आत्महत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक

आगाशिवनगर येथील युवकाच्या आत्महत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड (सातारा) : आगाशिवनगरच्या युवक मंगेश बंडू कडव यांच्या आत्महत्या प्रकरण गाजू लागले आहे. पोलिसांनी बारकाव्याने तपास करत त्या प्रकरणात आणखी दोघांना आज गजाआड केले. विक्रम जयवंत येडगे (वय 22, रा. जखिणवाडी) व संतोष प्रल्हाद मदने उर्फ तात्या (22, रा. वनवासमाची) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या चार झाली आहे. चौघांनाही मंगेशला मानसिक, शारिरीक त्रास दिल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. यामध्ये एक युवतीही संशयीत आहे, ती सध्या फरार आहे. तीचाही यात सहभाग असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहाय पोलिस निरिक्षक रेखा दुधभाते यांनी दिली.

हेही वाचा: महाबळेश्वरात नवऱ्याने पेटवून दिलेल्या पत्नीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मंगेश कडवला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश कडवने वारणा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरळप पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा तालुका पोलिसांकडे वर्ग झाला आहे. या प्रकरणी मंगेशचा भाऊ गणेश कडवने फिर्याद दिली आहे. त्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात ओंकार व रोहन यांना परवा रात्री अटक झाली आहे.

हेही वाचा: तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून 'वाद'

त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. त्यात ओंकरसह रोहनने मंगेशला मानसिक त्रास दिल्याचे त्याच्याकडून पैसेही उकळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे तपास करतानाच ज्या दिवसी मंगेशला मारहाण झाली. त्यावेळी मारहाण करण्यात आणकी काही लोकांचा सहभाग होता, अशी माहिती सहाय पोलिस निरिक्षक दुधभाते यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कसून तपास केला. त्यावेळी गुन्हा दाखल जालेल्या स्वातीसह आणकी काही लोकांचा समावेश असल्याचा त्यांच्या संशय बळावला.

हेही वाचा: जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

मंगेशला ओंकार खबाले-पाटीलने दोन सप्टेंबरला मारहाण केली होती. मंगेशच्या वडीलांनी त्यावेळी ओंकारसहीत त्याची बहिणी स्वाती बोराटे व अन्य चौघांनी मंगेशला मारहाण करताना पिहेल होते. त्यावेळी वडिलांनी मंगेशला सोडवले. त्यानंतर मंगेश दुचाकीवरून बेपत्ता होता. रात्री उशीरापर्यंत तो घरी गेलाच नाही. मंगेशचा ओंकारने मंगेशचा दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांकडे दिला. तो देताना मंगेशबाबत पुन्हा धमकी दिली.

हेही वाचा: पाटण : पावसाच्या पुनर्रागमनाने शेतकरी हरखला; पिकांना मिळालं जीवदान

मंगेशची दुचाकी पेठ वडगावच्या हद्दीत वारणा नदीच्या पुलावर सापडली. पोलिसांनी ती जप्त केली. त्याचदरम्यान मंगेशचा मृतदेह वारणा नदीत कणेगावच्या हद्दीत त्याचा मृतदेह सापडला. त्यावरुन मंगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यातील आज दोघांना तर परवा अन्य दोघे अशा चौगांना अटक झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते तपास करत आहेत.

loading image
go to top