Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
Summary

जर तुम्ही Telegram यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपले प्लॅटफॉर्म आणखी अ‍ॅडवान्स करण्यासाठी फीचर्सची एक नवीन सीरीज सादर केली आहे. नवीन डेव्हलपमेंटनुसार, Telegram आता 1000 लोकांना ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये (Group Video Call) सहभागी होण्याची परवानगी देईल.

पुणे: जर तुम्ही एक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप Telegram यूजर्स असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपले प्लॅटफॉर्म आणखी अ‍ॅडवान्स करण्यासाठी फीचर्संची नवीन सीरीज सादर केली आहे. नवीन डेव्हलपमेंटनुसार, Telegram आता 1000 लोकांना ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये (Group Video Call) सहभागी होण्याची परवानगी देईल आणि यूजर्संना व्हिडिओ मॅसेज पाठविण्याची परवानगी देखील देईल. एवढेच नाही तर, टेलिग्रामने आता सर्व व्हिडिओ कॉलसाठी साऊंडसह स्क्रीन शेअरिंग सक्षम केले आहे. ज्यामध्ये one-on-one कॉल Add आहेत. या सर्व फीचर्संसह, अ‍ॅप त्याच्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअ‍ॅपला कडी टक्कर देईल.

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
आता WhatsApp वर मॅसेज करा शेड्यूल, जाणून घ्या सविस्तर

Telegram ने सांगितले की, हा समूह इतका जास्त वाढला पाहिजे, जितक्या एका कॉलमध्ये अनेक लोक एकत्र व्हायला हवे. म्हणूनच, कंपनीने सुमारे 1000 सहभागींना व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे, तर 30 यूजर्स त्यांच्या कॅमेरा आणि स्क्रीन दोन्हीवरून व्हिडिओ ब्रॉडकास्ट करू शकतात. यासह, अ‍ॅपमध्ये आणखी अनेक फीचर्सं सादर केली गेली आहेत.

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
Sugar Daddy App काय आहे? Google ने केलेय बॅन, जाणून घ्या डिटेल्स

Telegram ने आपले व्हिडिओ मेसेज फीचर्सं अपडेट केले आहे. टेलीग्राम म्हणते की, व्हिडिओ मेसेज आपल्या गॅलरीत दुसरा व्हिडिओ जोडल्याशिवाय आपल्या सभोवतालचे क्षण तपासण्याचा किंवा शेयर करण्याचा एक सोपा मार्ग आहे. आपण फक्त आपल्या चॅट बॉक्समधील रेकॉर्डिंग बटणावर टॅप करू शकता आणि ते आपल्या संपर्कांना पाठवू शकता. व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह केला जाणार नाही.

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
Telegram मध्ये येतायत काही जबरदस्त फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

Video Messages

टेलिग्रामने ब्लॉगमध्ये म्हटले आहे, “व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड करण्यासाठी, व्हॉइस मेसेज रेकॉर्डिंगवरून व्हिडिओवर स्विच करण्यासाठी मेसेज बारमधील मायक्रोफोन चिन्हावर टॅप करा. रेकॉर्ड करण्यासाठी Press आणि Hold करुन ठेवा, नंतर परत स्विच करण्यासाठी कॅमेरा चिन्हावर टॅप करा. रेकॉर्ड केल्याप्रमाणे तुमच्या डिव्हाइसवरील ऑडिओ प्ले होत राहील, त्यामुळे तुम्ही आता तुमच्या आवडत्या म्युजिकबरोबर गाऊ शकता किंवा न थांबता तुमच्या पॉडकास्टला उत्तर देऊ शकता. याव्यतिरिक्त, आपल्या मागील कॅमेरासह रेकॉर्डिंग करण्यासाठी झूम आणि कॅप्चर करण्यास किंवा dramatic effect अ‍ॅड करु शकता.

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
Signal, Telegram आणि WhatsApp; कोणतं अ‍ॅप डेस्कटॉपसाठी बेस्ट?

Video Playback speed

आता तुम्ही Telegram द्वारे पाठवलेल्या व्हिडिओंचा प्लेबॅक स्पीड बदलू शकता. अ‍ॅपवरील मीडिया प्लेयर आता 0.5x, 1.5x आणि 2x प्लेबॅक स्पीडला सपोर्ट करतो. त्यामुळे त्याचा वापर फास्ट फॉरवर्ड कॉल करण्यासाठी किंवा मंद गतीने व्हिडिओ पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. व्हिडिओ प्लेबॅकचा स्पीड बदलण्यासाठी, पूर्ण स्क्रीनवर व्हिडिओ पाहताना Android वर तीन डॉट्स किंवा iOS वरील तीन हॉरिजॉन्टल डॉट्स टॅप करा. अँड्रॉइड युजर्स 0.5x, 1x, 1.5x आणि 2x प्लेबॅक स्पीडमध्ये स्विच करण्यासाठी म्युजिक किंवा व्हिडिओ मेसेज प्ले करताना 2X बटण दाबून ठेवू शकतात.

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
प्रायव्हसी पॉलिसीने WhatsApp ची गेम; Telegram ला झाला फायदा

Sharing screen with sound

Telegram आता यूजर्संना कोणत्याही व्हिडिओ कॉलमध्ये ब्रॉडकास्ट करताना त्यांच्या डिव्हाइसवर one-on-one कॉलवर स्क्रीन शेअर करण्याची अनुमती देईल. याचा अर्थ, जर तुम्ही फिल्म पाहत असाल तर तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करू शकता आणि तुमच्या मित्रासोबत फिल्म पाहू शकता.

Telegram च्या व्हिडिओ कॉलमध्ये हजार जणांना होता येणार सहभागी
Telegram ने पुन्हा उडवली Whatsapp ची खिल्ली; शेअर केलं मीम

Telegram ने ब्लॉगमध्ये म्हटले आहे, "कोणत्याही कॉल दरम्यान व्हिडिओवर स्विच करताना, तुम्ही कॅमेरा निवडण्यासाठी स्वाइप करू शकता किंवा त्याऐवजी तुमची स्क्रीन शेअर करू शकता आणि लाइव्ह होण्यापूर्वी सर्व काही परिपूर्ण आहे याची खात्री करण्यासाठी व्हिडिओ प्रिव्हयूचा वापर करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com