Space GK : अंतराळात मरण पावलेल्या 'त्या' तीन अंतराळवीरांचे मृतदेह पृथ्वीवर कसे आणले? स्पेसमध्ये कधी कोणी गायब झालं आहे का?

स्पेस एक्स्प्लोरेशन हे एक अत्यंत धोकादायक क्षेत्र आहे. अंतराळ मोहिमांमध्ये आत्तापर्यंत १८८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
Astronauts in space
Astronauts in spaceSakal

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो लवकरच आपल्या गगनयानाच्या साहाय्याने अंतराळामध्ये मानवी मोहीम पाठवण्याची तयारी करत आहे. चांद्रयान - ३ चे यश आणि आदित्य एल १ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता भारतीय वैज्ञानिक गगनयानाच्या माध्यमातून तीन भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणार आहे.

हे अंतराळवीर ठरलेल्या कक्षेमध्ये तीन दिवस राहतील आणि त्यानंतर सुरक्षितपणे भारतामध्ये परत येतील. त्यांना समुद्रात उतरवलं जाईल. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था म्हणजे नासासुद्धा मानवी अंतराळ मोहिमांची तयारी करत आहे. तर काही खासगी अंतराळ संस्थासुद्धा अंतराळ पर्यटनासाठी काम करत आहेत.

Astronauts in space
Elon Musk Car In Space: पाच वर्षांपूर्वी इलॉन मस्कने अंतराळात पाठवली होती टेस्लाची रोडस्टर, आता कुठे आहे कार?

जगभरातून आजवर ६०० हून अधिक लोकांना अंतराळामध्ये पाठवण्यात आलं आहे. सर्वात पहिल्यांदा १९६१ मध्ये सोवियत संघाचे अंतराळवीर युरी गागरिन अंतराळ यात्रेला गेले होते. अंतराळात जाणारे बहुतांश अंतराळवीर नासाचा भाग होते. नुकतंच अंतराळवीरांशिवाय इतर काही लोकांनी अंतराळ पर्यटन म्हणून अंतराळ यात्रा केली आहे. पण असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की या ६०० लोकांपैकी कोणाचा अंतराळामध्ये मृत्यू झाला आहे का? झाला असेल, तर त्यांचा मृतदेह पृथ्वीवर कसा आणला? अंतराळात गेलेली अशी कोणती व्यक्ती आहे का जी अंतराळातच गायब झाली?

Astronauts in space
Aditya L1 Mission: इतका तप्त की हिराही वितळेल; विमानाने तिथवर जायला लागतील २० वर्षे; नक्की सूर्य कसा आहे?

स्पेस एक्स्प्लोरेशन हे एक अत्यंत धोकादायक क्षेत्र आहे. तुम्ही अपोलो १ प्रशिक्षण दल किंवा स्पेस शटल चॅलेंजर अशा दुर्घटनांबद्दल अवश्य ऐकलं असेल. अंतराळ मोहिमांमध्ये आत्तापर्यंत १८८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

१९८० च्या दशकानंतर अशा दुर्घटना कमी झाल्या आहे. आता अंतराळ संस्था अत्याधुनिक सुरक्षा प्रोटोकॉल पाळतात. अंतराळाशी संबंधित दुर्घटना बहुतांश वेळा जमिनीवर पोहोचण्याच्या आधी काही अंतरावर झालेल्या आढळून आल्या. यालाच अंतराळ म्हणतात. या सीमेला कार्मन रेषा म्हटलं जातं. ही रेषा समुद्रापासून १०० किलोमीटर म्हणजे ६२ मैल वर आहे.

अंतराळयान अंतराळातच हरवून जाण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. अपोलो १० चंद्राची परिक्रमा करत असताना त्याने डिसेंट मॉड्यूल वापरलं. या मॉड्युलमध्ये कोणताही अंतराळवीर नव्हता. पण हे मॉड्यूल अवकाशात कुठेतरी हरवलं. काही दुर्घटना उपग्रह किंवा कोणत्यातरी गोष्टीला धडकल्याने होतात. अंतराळामध्ये दुर्घटनाग्रस्त यान पृथ्वीवर पडतात आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच उष्णतेमुळे त्यांचं विघटन होतं.

अंतराळात १९७१ साली एक दुर्घटना झाली होती. त्यावेळी सॅल्यूट १ अंतराळ स्थानकावरुन परत येत असताना सोयुज - ११ च्या कॅप्सुलचा दबाव कमी झाला होता. त्यामुळे चालक असलेल्या जॉर्जी डोब्रोवोल्स्की, व्लादिस्लाव वोल्कोव आणि विक्टर पाटसायेव या तिघांचा मृत्यू झाला. हे कॅप्सुल पृथ्वीकडे परतत होतं, ते तसंच पुढे आलं आणि समुद्रामध्ये कोसळलं. त्यानंतर तिन्ही अंतराळवीरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले.

Astronauts in space
Aditya L1 : 'आदित्य एल-1'च्या वैज्ञानिकांसाठी लागू होता विचित्र नियम; परफ्यूम वापरण्यावर होती बंदी! जाणून घ्या कारण

१९६० सालचा एक प्रसिद्ध षड्यंत्र सिद्धांत म्हणजे ‘द लॉस्ट कॉस्मोनॉट्स’. सिद्धांतानुसार, युरी गागारिनच्या अंतराळ प्रवासाच्या पहिल्या यशस्वी प्रयत्नापूर्वी सोव्हिएत युनियनने अनेक गुप्त प्रयत्न केले होते. अशाच एका प्रयत्नात अंतराळात अपघात झाला, ज्यामध्ये काही अंतराळवीरांचा मृत्यू झाला. सोव्हिएत युनियनने हे संपूर्ण प्रकरण सार्वजनिक होऊ दिले नाही. द लॉस्ट कॉस्मोनॉट थिअरी खरी आहे की खोटी हे आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. असा कोणताही पुरावा आजपर्यंत समोर आलेला नाही, ज्यामुळे हा सिद्धांत बरोबर असल्याचं सिद्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com