पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या 'या' ग्रहावर उगवतात चक्क दोन सूर्य! नासाचा नवा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scientists new innovation about earth like planet

पृथ्वीसारख्या दिसणाऱ्या 'या' ग्रहावर उगवतात चक्क दोन सूर्य! नासाचा नवा शोध

शास्त्रज्ञ सतत पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागाचा बारकाईने अभ्यास करत असतात. संपूर्ण ब्रम्हांडमध्ये आपल्यासारखं आणखी एखादी जग असेल काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र प्रत्येकाला त्याचं उत्तर शोधणं शक्य नाही. अशाच एका प्रश्नाच्या शोधात शास्त्रज्ञांच्या एका टीमने पृथ्वीपासून जवळ जवळ १०० वर्ष प्रकाशाच्या अंतरावर एका ग्रहाचा शोध लावलाय. हा ग्रह पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे. वैज्ञानिकांच्या मते या ग्रहाचं नाव TOI-1452 b आहे. (Scientists new innovation about earth like planet)

हा युनिवर्सचा असा भाग आहे ज्यामध्ये तापमान अधिकही नाही आणि कमीही नाही,याठिकाणी मध्यम वातावरण आहे. शास्त्रज्ञांच्या मते,या ग्रहावर पाणी असल्याचाही त्यांचा अंदाज आहे. शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासाच्या आधारावर या ग्रहाबाबत मोठा खुलासा केलाय. हा ग्रह पृथ्वीपेक्षा ७० पटीने मोठा असू शकतो. नासाने ट्रांझिटिंग एक्झोप्लॅनेट सर्वे सॅटेलाईट (TESS) च्या मदतीने या ग्रहाचा शोध लावलाय.

पृथ्वीसारखा दिसणारा आतापर्यंतचा उत्तम ग्रह

नासाच्या मते, या ग्रहाचा शोध रंजक होता. शास्त्रज्ञांना या ठिकाणी पाणी असल्याची आशा आहे. या ग्रहावर अनेक महासागर असण्याचीही शक्यता आहे. तसेच हा ग्रह हायड्रोजन आणि हेलियमच्या वातावरणाने बनलेला असू शकतो असंही शास्त्रज्ञ म्हणाले.

मॉन्ट्रियल यूनिवर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या ग्रहाचा शोध लावलाय. या संशोधनाचे प्रमुख चार्ल्स कॅडियक्सच्या मते, हा ग्रह( TOI-1452b) आजपर्यंत लावलेल्या ग्रहांच्या शोधात सगळ्यात उत्तम असल्याचं सांगितल्या जातंय. या ग्रहावर ३० टक्के पाणी असण्याची शक्यता असते. ज्याचा शोध लावण्यासाठी जेम्स वेब टेलीस्कोपचा प्रयोग करावा लागेल. मिडिया रिपोर्टनुसार या ग्रहावर दोन सूर्य आहेत. हा ग्रह ११ दिवसात एकदा परिक्रमण करतो.

Web Title: Nasa Scientists Found New Planet Which Is 70 Times Bigger Than Earth Also There Are Two Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..