जाणून घ्या TikTok डिलिट करण्याच्या लाटेमागची प्रमुख कारण...

TikTok App, India, China
TikTok App, India, China

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चीनच्या वुहान शहरात Covid-19 चा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर कोरोनाने जगभरात आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली. हा व्हायरस नेमका कसा निर्माण झाला याबाबत मतमतांतरे असली तरी संशयांची सुई चीनकडे जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांमध्ये चीनविरोधात नाराजीचा सुरु आहे. भारतामध्ये तर चीनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु झाली आहे. अनेक चीनी वस्तूंसह चीनी ऍप असलेल्या टिकटॉकलाही याचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.  कारण अनेक भारतीयांनी टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.  

सध्या ट्विटरवर #BanTikTok आणि #BanTikTokIndia हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला असल्याने या मोहिमेने गती घेतली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अनेक भारतीयांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबरोबर टिकटॉक ऍप आपल्या मोबाईलमधून डिलिट करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे टिकटॉकची रेटिंग आठवड्याभराच्या काळात 4.6 वरुन 2 वर आली आहे. गुगल प्ले स्टोअर आणि Apple अॅप स्टोअरवर अनेक युजर्संनी टिकटॉकला 1 स्टार रिव्हिव दिला आहे. त्यामुळे भारतीयांच्या स्वदेशीच्या नाऱ्यामुळे टिकटॉकला दणका बसला असल्याचं दिसत आहे.

अनेकदा टिकटॉकवरुन महिलांवर ऍसिड हल्ला, बलात्कार यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. फैजल सिद्धीकी या टिकटॉक स्टारने ऍसिड हल्ला झालेल्या महिलांबाबत आक्षेपार्ह भाष्य करणारा व्हिडिओ शेअर केला होता. टिकटॉकने हा व्हिडिओ हटवला असला तरी यासारख्या कारणांमुळे टिकटॉकविरोधात रोष वाढत जात आहे. हिंसेला प्रोत्साहन देणे, प्रतिमा हनन करणे, महिलांबाबत अश्लिल भाष्य करणे इत्यादी प्रकार टिकटॉकवर सर्रास पाहायला मिळत आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. टिकटॉकमुळे तरुण मुले वेळेचा दुरुपयोग करत असून फक्त फॉलोवर्स वाढवण्याच्या उद्धेशाने ते अश्लिल व्हिडिओ बनवत आहेत. त्यामुळे टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी भारतात यापूर्वीही अनेकदा झाली आहे. मात्र, टिकटॉक हे देशात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे ऍप आहे. अनेकांना या ऍपने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असल्याने अनेकजण या माध्यमातून व्यक्त होत असतात. शिवाय सध्या लॉकडाउनचा काळ असल्याने अनेकजण टिकटॉकचा आधार घेत आहेत. नुकतेच टिकटॉकने जगभरात 200 कोटी डाऊनलोडचा टप्पा पार केला आहे. शिवाय भारतातही टिकटॉकचा चांगलाच दबादबा आहे. टिकटॉकचे भारतातील प्रमुख निखिल गांधी यांनी वर्षअखेर 50% भारतीयांच्या मोबाईलमध्ये हे ऍप असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com