Royal Enfieldची इलेक्ट्रीक बाईक लवकरच होणार लॉन्च

Royal Enfield Electric Bike Range Likely to Debut By 2023
Royal Enfield Electric Bike Range Likely to Debut By 2023

जर तुम्ही Royal Enfieldची बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण कंपनी येत्या काळामध्ये आपली इलेक्ट्रीक बाईक लॉन्च करणार आहे. पण, अद्याप कंपनीमार्फत याबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही

1 ऑगस्ट 2020 रोजी, रॉयल एनफिल्डचे सीईओ विनोद दासरी यांनी सांगितले होते की, कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकल विभागात प्रवेश करण्याची योजना आखत आहे. या घोषणेनंतर, मूळ निर्मात्याने 2020-21 च्या वार्षिक अहवालात स्पष्ट केले होते की कंपनी इलेक्ट्रॉनिक श्रेणी विकसित करत आहे.

Royal Enfield Electric Bike Range Likely to Debut By 2023
Jio Vs Airtel : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, मोफत कॉलिंगसह मिळवा बरचं काही

या दुचाकी कंपन्याही लॉन्च करणार आहेत

TVS, Hero, Atherआणि BMW सारख्या प्रमुख दुचाकी उत्पादक कंपन्या येत्या काही महिन्यांत त्यांचे EV लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. रॉयल एनफिल्डनेही यासाठी तयारी सुरू केली आहे आणि नवीन बाजारपेठेत वर्चस्व गाजवण्याच्या शर्यतीत पुढे जाण्यासाठी उत्सुक आहे. रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी पुष्टी केली आहे की, ''भारतीय आणि जागतिक बाईक बाजारपेठे दोन्हीसाठी इलेक्ट्रिक बाइक श्रेणीबाबत विचारात करण्यासाठी प्रोडक्शन लाइन यूती करणार आहे.''

नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित बाइक्स

रॉयल एनफिल्ड ही पर्यावरणीय, सामाजिक आणि सरकारी उद्देशांसाठी काम करणारी कंपनी आता विद्युतीकरणाच्या प्रक्रियेला गती देत आहे. कंपनीने प्रथम रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाइकचा प्रोटोटाइप तयार केला आणि ही ईव्ही तयार करण्यास सुरुवात केली. अशी आशा आहे की,''रॉयल एनफिल्डद्वारे निर्मित इलेक्ट्रिक बाइक नवीन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल आणि अनेक नवीन फिचर्स उपलब्ध आहे.

Royal Enfield Electric Bike Range Likely to Debut By 2023
Instagram यूजर्ससाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार आहेत हे 7 नवीन फीचर्स

लॉन्च कधी होणार माहित आहे?

रॉयल एनफिल्ड 2023 मध्ये कधीही भारतात आपले इलेक्ट्रिक उत्पादन सुरू करण्याची घोषणा करू शकते. कंपनी सध्या युनायटेड किंगडम-आधारित संशोधन आणि विकास शाखेमध्ये प्रोटोटाइप सादर करण्यायोग्य बनविण्यासाठी काम करत आहे. इंडिया कार न्यूजनुसार, बाईक 8 kWh ते 10 kWh पर्यंत बॅटरी पॅक वापरू शकते आणि इलेक्ट्रिक मोटरसह जोडली जाईल. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील सध्याच्या ट्रेंडनुसार, बाइकची पॉवर आणि पीक टॉर्क सुमारे 40 bhp आणि 100Nm असणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com