WhatsApp प्रायव्हसीतील त्रुटी लपवण्यासाठी जाहिरातींचा भडीमार?

whatsapp
whatsapp
Summary

WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉटसअॅपचं बिझनेस अकाउंट असेल तर त्यात होणारं चॅट वाचलं जाईल आणि त्याआधारे युजर्सना जाहिराती दिसतील.

WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉटसअॅपचं बिझनेस अकाउंट असेल तर त्यात होणारं चॅट वाचलं जाईल आणि त्याआधारे युजर्सना जाहिराती दिसतील. व्हॉटसअॅप याचा डेटा फेसबुकलासुद्धा शेअर करणार आहे. नव्या पॉलिसीनंतर जगभरात वाद निर्माण झाला. युजर्सनी व्हॉटसअॅप अनइन्स्टॉल केलं आणि सिग्नल टेलिग्राम यांसारख्या अॅप्सचा वापर सुरु केला. प्रायव्हसीच्या वादानंतर व्हॉटसअॅपकडून आता जाहिरातीवर मोठा खर्च केला जात आहे. अगदी रेडिओपासून टीव्ही ते वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या जात आहेत. युट्यूबवरसुद्धा सातत्यानं जाहिराती दाखवल्या जात आहेत. व्हॉटसअॅपला आताच इतक्या जाहिराती दाखवण्याची गरज का पडली असा प्रश्न आता विचारला जात आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून व्हॉटसअॅप युजर्सच्या प्रायव्हसीबाबत अनेक दावे करत आहे.

इतक्या जाहिरातींचे कारण काय असू शकते यावर तज्ज्ञांचं मत असं आहे की, नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर वाद झाल्यानं व्हॉटसअॅपला मोठा फटका बसला आहे. त्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. पण युजर्स पुन्हा व्हॉटसअॅपकडे वळावेत यासाठी जाहिराती देण्यात येत असाव्यात. याशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून कंपनी प्रयाव्हसी फीचरमध्ये असलेल्या त्रुटी लपवण्याचा प्रयत्न करत असेल. गेल्या पाच ते सहा महिन्यात भारतात व्हॉटसअॅपने मोठ्या प्रमाणावर जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत इतक्या जाहिराती युट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्मवर दिल्या जात नव्हत्या.

whatsapp
Samsung चा ५ जी स्मार्टफोन होणार लाँच, ही असतील फिचर्स

व्हॉटसअॅपकडून नेहमी असा दावा केला जातो की दोन युजर्समधील चॅट सुरक्षित आहे पण जर थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म म्हणजेच गुगल ड्राइव्ह सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर चॅट बॅकअपसाठी करत असाल तर तिथं सुरक्षितता धोक्यात येते. दुसरीकडे कंपनीने असाही दावा केला आहे की, थर्ड पार्टी बॅकअपसुद्धा एंड टू एंड इनक्रिप्टेड आहे. यानुसार दोघांमधल्या चॅटची माहिती ही केवळ दोघांनाच वाचता येते पण हे पूर्ण सत्य नाही. तुमच्याविरोधात एखाद्याने तक्रार केली तर कंपनी तुमचे मेसेज डिक्रिप्ट करून वाचू शकते.

कंपनी तुमचे मेसेज वाचत नाही असा दावा करते. मात्र नुकतंच इन्व्हेस्टिगेटिव्ह वेबसाइट ProPublica ने असं म्हटलं होतं की, व्हॉटसअॅपने जवळपास १ हजार कंटेंट रिव्ह्यूवर नियुक्त केले आहेत. यांच्याकडून व्हॉटसअॅपवर पाठवण्यात येणाऱ्या कंटेंट पाहण्याचं काम असून त्यांना एक स्पेशल सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. हे काम ऑस्टिन, टेक्सास, डब्लिन आणि सिंगापूरमधून केलं जातं.

whatsapp
नवीन फोन खरेदी करताय? मग या गोष्टींकडे द्या लक्ष

व्हॉटसअॅपने याबाबत असंही सांगितलं आहे की, ही टीम फक्त तोच कंटेंट वाचते ज्यात फसवणूक, चाइल्ड पोर्नोग्राफी, हेट स्पीच, दहशतवादी कट यासंदर्भात रिपोर्ट करण्यात आलेले असते. जेव्हा एखाद्या अकाउंटला किंवा कंटेंटला रिपोर्ट केलं जातं तेव्हा रिव्ह्यूवर शेवटचे पाच मेसेजसुद्धा पाहू शकतो. म्हणजेच रिपोर्ट केलेल्या मेसेजशिवाय इतर कंटेटंसुद्धा त्यांना दिसत असून व्हॉटसअॅप पूर्णपणे सुरक्षित नाही असंच म्हटलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com