Whatsapp वर तुम्हाला ब्लॉक केलंय का? असं करा अनब्लॉक | Whatsapp Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

Whatsapp वर तुम्हाला ब्लॉक केलंय का? असं करा अनब्लॉक

व्हॉट्सअप आता आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle) भाग झाला आहे. युझर्स अनेक ग्रुपवर एक्टीव्ह असतात. काहीवेळा ग्रुपवर वाद झाले किंवा नातेवाईकांशी खटकले तर बोलणंच नको म्हणून समोरच्याला सरळ ब्लॉक केलं जातं. त्यानंतर तुमचा कोणताही मॅसेज त्यांना दिसत नाही. व्हॉट्सअपने (Whatsapp) युझर्सना अनेक सिक्युरिटी फिचर्स देतो. त्याच्या मदतीमुळे दुसऱ्या युजरला (Users) ब्लॉक करता येते. पण, ब्लॉक केल्यावर समोरच्याने अनब्लॉक करेपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. अशावेळी स्वत:ला अनब्लॉक कसे करायचे याचे काही पर्याय आहेत.

हेही वाचा: डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखायचयं! 'हे' पाच पदार्थ खा

असे करा अनब्लॉक

1) यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअप अकाऊंट डिलिट करावे लागेल. अकाऊंट डिलिट करून तुम्ही स्वत:ला अनब्लॉक करू शकतात. पण असे करताना हे लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या पूर्ण अकाऊंटचा डेटा डिलिट होईल.

२) अकाऊंट डिलिट करण्याआधी सगळ्यात आधी व्हॉट्सअप अॅप ओपन करा. त्यानंतर मेन्यूमध्ये जाऊन सेटिंग पर्यायावर क्लिक करा.

हेही वाचा: Google Map वरची ठिकाणं शोधा; भरपूर पैसे मिळवा!

३) येथे तुम्हाला अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय स्क्रीनवर दिसतील. त्यात Delete my account या पर्यायावर क्लिक करा.

४) हे केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप पुन्हा डाऊनलोड करायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमचे व्हॉट्सअप सुरू होईल. त्यानंतर ज्याने तुम्हाला ब्लॉक केले होते त्याला तुम्ही पुन्हा मॅसेज करू शकता.

हेही वाचा: SBI, HDFC बँकेच्या FD व्याजदरात वाढ; जाणून घ्या कारण!

Web Title: Whatsapp Tips How To Unblock Yourself On Whatsapp Know The Trick

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :whatsappTipsTrickBlock
go to top