esakal | World Wide Web Day : काय आहे या दिवसाचे महत्व आणि इतिहास? जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

www

World Wide Web Day : काय आहे या दिवसाचे महत्व आणि इतिहास? जाणून घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आज वर्ल्ड वाइड वेब डे आहे. इंटरनेट आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते आहे. आजकाल, आपण अगदी लहान लहान गोष्टींसाठी इंटरनेटवर अवलंबून आहोत जसे की, रिसर्च, आपले आर्थिक व्यवहार, लोकांशी कनेक्टेड राहणे इत्यादी. इतकेच नाही तर जगभारात चालणारा व्यापार देखील मुख्यतः इंटरनेटवर अवलंबून आहे, इंटरनेटमुळे या सगळ्या गोष्टी अगदी सेकंदात केल्या जाऊ शकतात. या नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्यासमोर प्रत्येक क्षेत्रात असंख्य शक्यता निर्माण झाल्या. अगदी जगभरातील सर्व देशातील सरकारी यंत्रणा देखील सकारी चालवण्यासाठी इंटरनेटचा वापर करतता. सध्याच्या काळात वर्ल्ड वाइड वेब हे इंटरनेटचे सर्वात महत्वाचे साधन आहे कारण त्याशिवाय एकमेकांशी जोडले जाणे सध्याच्या काळात अशक्य आहे. म्हणूनच, आपल्याकडे वर्ल्ड वाइड वेबचा सन्मान करण्यासाठी आजचा एक दिवस साजरा केला जातो.

वर्ल्ड वाइड वेबमुळे अशा अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे जे यापूर्वी शाक्य नव्हते. यामध्ये जगाच्या दुसऱ्या बाजूला राहणारे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना भेटणे तसेच अक्षरशः कोणत्याही विषयाबद्दल माहिती शोधणे याचा समावेश आहे! आज इंटरनेटकडे जी शक्ती आहे आणि त्याने आपले जीवन वेगवेगळ्या प्रकारे कसे समृद्ध केले आहे.

वर्ल्ड वाइड वेब हे खरं तर जगभरातील माहितीचे माध्यम आहे ज्याद्वारे लोक इंटरनेटशी जोडलेले असताना त्यांचे संगणक वापरून ते एक्सेस करू शकतात. दरम्यान इंटरनेट वापरताना, तुम्ही पाहिले असेल तर प्रत्येक वेबसाईटच्या एड्रेसच्या सुरुवातीला येतं त्या www चा अर्थ काय? आणि त्याचा शोध कोणी आणि कधी लावला? त्याचा इतिहास काय आहे? त्याचे फायदे काय आहेत ईत्यादी बाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

वर्ल्ड वाइड वेब म्हणजे काय?

वर्ल्ड वाइड वेब हे हायपरटेक्स्ट मार्क-अप भाषा किंवा HTML वापरून हायपरमीडियाचा संदर्भ देते. याला WWW, W3 किंवा वेब असेही म्हणतात. ही इंटरनेटवर सर्वाधिक वापरली जाणारी सेवा आहे. याद्वारे, अनेक वेब सर्व्हर आणि क्लायंट एकत्र जोडले जातात. आपल्या सर्वांना माहित आहे की फोटो, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचा ऑनलाइन कंटेन्ट वेब सर्व्हरच्या HTML डॉक्यूमेंट्स साठवले जातात जे वेबच्या मदतीने आपल्याल केव्हाही मिळवता येतात. हायपरटेक्स्ट डॉक्युमेंटमधील कोणताही शब्द वेगळ्या हायपरटेक्स्ट डॉक्युमेंटसाठी पॉईंटर म्हणून नोट केला जाऊ शकतो जिथे त्या शब्दाशी संबंधित अधिक माहिती मिळू शकते.

WWW एक प्रकारचे इनफॉर्मेशन स्पेस आहे जिथे डॉक्यूमेंट्स आणि इतर माहिती युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर URL द्वारे शोधली जाते. जसे की https://www.example.com ज्याला हायपरटेक्स्ट द्वारे जोडले जाऊ शकते आणि इंटरनेटद्वारे ही माहिती कधाही एक्सेस केली जाऊ शकते. वेब ब्राउझर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर एप्लिकेशन मध्ये वापरकर्ते अगदी सहज WWW एक्सेस करु शकतात

जगभरातील सर्व वेबसाईट आणि वेब पेज जे तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरवर पाहता ते सर्व वेबशी जोडलेले आहेत आणि ते एक्सेस करण्यासाठी हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर केला जातो. हा सर्व वेब सर्व्हरचा एक प्रकारचा संग्रह आहे. अधिक समजून घेण्यासाठी, जेव्हा URL ब्राऊझरच्या अॅड्रेस बारवर एखाद्या वेबसाईटच्या आधी www असते तेव्हा याचा अर्थ होतो की ही वेबसाइट वेब सर्व्हरवर स्टोर केलेली आहे आणि ती वेबशी जोडलेली असून ती एक्सेस करण्यासाठी www मदत आवश्यक आहे.

वर्ल्ड वाइड वेबचा इतिहास

1989 मध्ये, CERN मध्ये काम करत असताना, ब्रिटिश वैज्ञानिक टीम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेब (WWW) चा शोध लावला. जगभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील शास्त्रज्ञांमध्ये माहिती-शेअर करण्यासाठी हे विकसित केले गेले. WWW ची मूलभूत कल्पना संगणक, डेटा नेटवर्क आणि हायपरटेक्स्टची प्रगत तंत्रज्ञान एक शक्तिशाली आणि वापरण्यास सोप्या अशा जागतिक माहिती प्रणालीमध्ये विलीन करणे होती.

टिम बर्नर ली बद्दल

इंग्लंडमध्ये जन्मलेल्या टीम बर्नर ली यांनी क्वीन्स कॉलेज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. त्यांनी 1976 मध्ये भौतिकशास्त्रात पदवी मिळवली. भौतिकशास्त्राबरोबरच त्यांना गणिताचेही चांगले ज्ञान होते. 1984 मध्ये टिमला जिनेव्हा येथील युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) मध्ये फेलो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. लॅबमध्ये अनेक प्रकारचे संगणक होते, ज्यावर डेटा वेगवेगळ्या स्वरूपात साठवला जात असे. टिमचे काम हे होते की हा डेटा एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर योग्य प्रकारे ट्रांन्सफर करणे. मग त्याने सर्व माहिती आणि डेटा एकत्र करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतींवर विचार करायला सुरुवात केली.

या काळात टिम यांनी कंप्युटर ब्राउझर प्रोग्राम लिहिला. त्यांनी तीन तंत्रज्ञानांची फंडामेंटल्स लिहिली, ज्यात HTML, URL आणि HTTP समावेश होतो. अशा प्रकारे इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेबचा शोध लागला. 6 ऑगस्ट 1991 रोजी टिमने वर्ल्ड वाइड वेब प्रकल्पाचा शोधनिबंध प्रकाशित केला. 1989 मध्ये टिम बर्नर लीच्या सर्न (CERN) लॅबमध्ये याचा प्रथम वापर करण्यात आला.

यानंतर हे वेब ब्राउझर 1991 मध्ये CERN लॅबच्या बाहेर जगभरातील वापरकर्त्यांसाठी रिलीज करण्यात आले. इतर संशोधन संस्थांनीही यावर काम केले. अशा प्रकारे इंटरनेटचा जन्म 6 ऑगस्ट रोजी झाला. यानंतर तयार करण्यात आलेली पहिली वेबसाईट होती https://info.cern.ch. वर्ल्ड वाइड वेब प्रथम CERN ने स्वतःच्या अधिकारातच ठेवले होते, परंतु नंतर ते 1992 मध्ये ते जगभरात रिलीज करण्यात आले. एक वर्षानंतर, 1993 पासून, संपूर्ण जगाला त्याचा एक्सेस मिळाला.

इंटरनेट आणि www मधील फरक काय आहे?

जेव्हा आपण इंटरनेटवर वेबसाईट उघडतो, तेव्हा त्याच्या लिंकमधील पहिल्यांदा येतं ते www. हे www वेगवेगळ्या रिसोर्सेसचा आणि त्या लिंकमध्ये दाखवलेल्या डॉक्यूमेंट्सचा संग्रह असते, ज्यांना एकत्र करुन कुठलीही वेबसाइट बनवली गेलेली असते.

इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेबमध्ये कनेक्शन आहे, हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. वर्ल्ड वाइड वेब हे माहितीचा संग्रह आहे जो लिंक्सच्या स्वरूपात असतो खरं तर हे एक तंत्रज्ञान आहे ज्यामुळे जगभरातील संगणक एकमेकांशी जोडलेले आहेत. वर्ल्ड वाइड वेब हे HTML, HTTP, वेब सर्व्हर आणि वेब ब्राउझरवर काम करते.

वेबसाइटच्या नावाला त्याची URL (युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर) असेही म्हणतात. जेव्हा आपल्याला एखादी वेबसाइट उघडायची असते, तेव्हा ब्राउझर अॅड्रेस बॉक्स किंवा अॅड्रेस बारमध्ये प्रोग्रामचे नाव किंवा URL टाकतो. या URL च्या मदतीने, ब्राउझर प्रोग्राम सर्व्हरवर पोहोचतो जिथे ती फाइल किंवा वेबसाइट साठवली जाते आणि त्यातून वेबपेज मिळवले जाते नंतर ते आपल्या संगणकावर दिसते. ब्राउझर प्रोग्राम मॉनिटरच्या स्क्रीनवर ती माहिती दिसते. त्या वेबसाइटवर अनेक हायपरलिंक्स देखील असू शकतात. प्रत्येक हायपरलिंक दुसऱ्या वेबपेज किंवा वेबसाइटची URL असते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ब्राउझर त्याच वेबपेज किंवा वेबसाइटवर आपल्याला पोहोचतो आणि ते वेबपेज वापरकर्त्यासाठी उपलब्ध करून देतो. अशा प्रकारे वापरकर्ता अशा कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ शकतो ज्यांचे URL किंवा नाव त्याला माहीत आहे.

हेही वाचा: Windows, iPhone आणि Android साठी धोक्याचा इशारा; दुर्लक्ष करणं पडेल महागात

जगातील पहिली वेबसाइट

जगातील पहिल्या वेबसाईटचा वेब एड्रेस होता https://info.cern.ch/hypertext/WWW/TheProject.html आणि ही वेबसाईट उघडल्यास एक अतिशय साधे वेबपेज दिसत असे या वेबसाईटवर हायपरटेक्स्ट, वेब पेज तयार करण्यासाठीची तांत्रिक माहिती दिलेली होती.

वर्ल्ड वाइड वेबचे फायदे

- जगभरातील माहिती आणि लोकांशी संपर्क सहज संपर्क साधता येतो.

- माहिती मिळवण्यासाठी अत्यंत कमी किंमत मोजावी लागते.

- रॅपिड इंटरॅक्टीव्ह संवाद साधला जाऊ शकतो ज्याचा वापर विविध सेवांसाठी केला जाऊ शकतात.

- प्रोफेशनल कॉन्टॅक्ट आणि माहितीची देवाणघेवाण करता येते.

- माहितीच्या सोर्स शोधणे सोपे जाते आणि त्यांची अपडेटेड माहिती मिळत राहाते.

- हे एक प्रकारचे जागतिक माध्यम बनले आहे.

हेही वाचा: मोबाईल स्क्रीनटाईमला आळा घाला

loading image
go to top