esakal | जाणून घ्या मुंबईतील 'या' पाच प्रसिद्ध गणपतींबद्दल
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या मुंबईतील 'या' पाच प्रसिद्ध गणपतींबद्दल

मुंबईतील अनेक मंदिरांमध्ये गणपतीची विशेष पूजा केली जाते.

जाणून घ्या मुंबईतील 'या' पाच प्रसिद्ध गणपतींबद्दल

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

गणेश चतुर्थी हा सण देशाच्या सर्व भागात श्रद्धेने साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रात गणपती पूजेचा विशेष उत्सव असतो. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक घरात मूर्ती बसवून गणपतीची पूजा केली जाते. या निमित्ताने मुंबईतील अनेक मंदिरांमध्ये गणपतीची विशेष पूजा केली जाते. गणपतीची पूजा दहा दिवस चालते. या शुभ प्रसंगी गणपतीच्या पूजेबरोबर आरती केली जाते. ही धार्मिक मान्यता आहे की, या मंदिरांमध्ये गणपती बाप्पाच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा पूर्ण होतात. चला, त्यांच्याबद्दल सर्वकाही जाणून घ्या...

हेही वाचा: 'लालबाग राजा'च्या मंडपातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढलं बाहेर

लालबागमधील बाप्पाचे दर्शन...

लालबागचा राजा 'नवसाचा गणपती' म्हणूनही ओळखला जातो. या गणेश मंडळाची स्थापना 1934 साली झाली. तेव्हापासून दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षी लाखो भक्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यावर आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतात.

हेही वाचा: कसा असेल यंदाचा सिद्धिविनायक मंदिरातील माघी गणेशोत्सव, जाणून घ्या

सिद्धिविनायक महागणपती मंदिर...

सामान्य दिवसांतही पर्यटक आणि भक्त मोठ्या संख्येने गणपतीच्या दर्शनासाठी येतात. हे मंदिर 1692 मध्ये बांधले गेले. त्यानंतर आजपर्यंत सिद्धिविनायक मंदिर अनेक वेळा पुन्हा बांधले गेले आहे. हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा या प्रसिद्ध ठिकाणी आहे. मुंबई ते टिटवाळा हे अंतर फक्त 55 किलोमीटर आहे.

हेही वाचा: 'मुंबईच्या राजा'ची पूजा संपन्न, उत्सवात साधेपणा पण उत्साह मात्र तोच

गणेश गल्ली मुंबईचा राजा:

गणेश गल्ली (लेन) मधील मुंबईचा राजा हा गणपती लालबागचा राजापासून फक्त दोन लेन दूर आहे आणि खूप लोकप्रिय आहे. 1928 मध्ये गिरणी कामगारांच्या हितासाठी हे स्थापन करण्यात आले होते, ज्यामुळे ती परिसरातील सर्वात जुनी मूर्ती बनली.

हेही वाचा: व्यापारी-पोलीस वाद, 'लालबाग राजा'च्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब


खेतवाडीचा गणराज :

पुरस्कारप्राप्त खेतवाडीचा गणराज मुंबईतील सर्वात नेत्रदीपक गणेश मूर्तींपैकी एक मानला जातो. या मंडळाची स्थापना 1959 मध्ये झाली. ही मूर्ती सोन्याच्या दागिन्यांनी आणि हिऱ्यांनी सजलेली आहे.

हेही वाचा: Ganeshotsav 2021: मुंबईचा राजा गणेशगल्लीचा अभिनव उपक्रम; पाहा व्हिडिओ

अंधेरीचा राजा :

अंधेरीचा राजा मुंबई उपनगरांसाठी आहे. या मंडळाची स्थापना 1966 मध्ये तंबाखू कंपनी, टाटा स्पेशल स्टील आणि एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कामगारांनी केली होती.

loading image
go to top