General Knowledge: ब्रह्मांडातला सर्वात मोठा तारा, ज्यात सामावतील १० अरब सूर्य, हा तारा आपल्या सूर्यमालेत असता तर?

या ताऱ्याचं अंदाजे वय २ कोटी वर्षांच्या आसपास आहे. हा तारा आपल्या सूर्याच्या १० बिलियन पट मोठा असून त्याची रुंदी सूर्याच्या तुलनेत २,१५० पट जास्त आहे.
Red Super Giant star
Red Super Giant starSakal

भारताने आपली सौर मोहीम आदित्य एल १ चं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्या सूर्यामालेतील सर्वात मोठा तारा सूर्य आणि त्याच्याबद्दलची अनेक रहस्ये यांच्याविषयी उलगडा होणार आहे. वैज्ञानिकांना नवनवी माहिती मिळणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, आपल्या सूर्यमालेच्या बाहेर एक महाकाय तारा आहे ज्यामध्ये आपल्या सूर्याइतके १० अरब सूर्य मावतील. हा तारा आहे स्टीफेन्सन २-१८, याला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा माहित असलेला तारा मानला जातो.

कुठे आहे स्टीफेन्सन २-१८?

स्टीफेन्सन २-१८ आपल्या आकाशगंगेच्या ओपन क्लस्टरमध्ये आहे. 'द अॅस्ट्रोफिजिकल जर्नल'च्या माहितीनुसार, या ओपन क्लस्टरमध्ये स्टीफेन्सन २-१८ सारखे आणखी २६ महाकाय तारे सध्या अवकाशात आहेत. स्टीफेन्सन २-१८ हा तारा हायपर जाएंट तारा म्हणजे म्हणजे महाविशालकाय ताऱ्यांच्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट आहे.

हे महाविशालकाय तारे ब्रह्मांडामधले अतिशय दुर्मिळ तारे आहेत स्टीफेन्सन २-१८ ला स्टीफेन्सन २ DFK १ किंवा RSGC2-18 या नावानेही ओळखलं जातं.

Red Super Giant star
Aditya L1 Mission: इतका तप्त की हिराही वितळेल; विमानाने तिथवर जायला लागतील २० वर्षे; नक्की सूर्य कसा आहे?

सूर्यापेक्षा किती मोठा आहे हा तारा?

स्टीफेन्सन २-१८ आपल्या पृथ्वीपासून जवळपास २० हजार प्रकाशवर्ष लांब अंतरावर आहे. या ताऱ्याचं अंदाजे वय २ कोटी वर्षांच्या आसपास आहे. हा तारा आपल्या सूर्याच्या १० बिलियन पट मोठा असून त्याची रुंदी सूर्याच्या तुलनेत २,१५० पट जास्त आहे. हा तारा एवढा मोठा आहे की त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे प्रकाशवेगाने गेलो, तरीही या प्रवासाला ९ तास लागतील. प्रकाशवेगाने सूर्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जायला केवळ १४.५ सेकंद लागतात. स्टीफेन्सन २-१८ आपल्या आकाशगंगेतल्या सर्वात चमकदार ताऱ्यांपैकी एक आहे.

कसा शोध लागला या ताऱ्याचा?

अमेरिकी खगोल शास्त्रज्ञ चार्ल्स ब्रूस स्टीफेन्सन यांनी पहिल्यांदा या ताऱ्याचा शोध लावला. स्टीफेन्सन बरेल श्मिट टेलिस्कोपच्या साहाय्याने आकाशगंगेच्या उत्तरेचा अभ्यास करत होते. याच दरम्यान त्यांनी ओपन क्लस्टरचं निरीक्षण केलं. यामध्येच स्टीफेन्सन २-१८ समाविष्ट आहे.तेव्हा चार्ल्स ब्रूस स्टीफेन्सन यांनी अंदाज लावला की हे ओपन क्लस्टर ९८,००० प्रकाशवर्ष लांब आहे आणि यामध्ये असलेले सर्व तारे असेच विशालकाय आहेत.

Red Super Giant star
Aditya L1 : 'आदित्य एल-1'च्या वैज्ञानिकांसाठी लागू होता विचित्र नियम; परफ्यूम वापरण्यावर होती बंदी! जाणून घ्या कारण

याचं नाव कसं ठरलं?

यानंतर १९९० साली स्टीफेन्सन यांनी अॅस्ट्रोनॉमिकल जर्नलमध्ये एका लेखात याचा उल्लेख केला आणि लिहिलं की ओपन क्लस्टरमध्ये जवळपास १० अस्पष्ट, धुळीच्या आवरणातले आणि आगीच्या गोळ्यांप्रमाणे लाल रंगाचे तारे आहेत. यामधले बहुतांश तारे हे विशालकाय आहेत. त्यानंतर इतर खगोल वैज्ञानिकांनी या गोष्टीची पुष्टी केली. चार्ल्स ब्रूस स्टीफेन्सन यांच्या नावावरुनच या ताऱ्याचं नाव ठेवलं गेलं स्टीफेन्सन २-१८.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, स्टीफेन्सन २-१८ एवढा विशाल आहे की त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीइतक्या अजून १ लाख ४० हजार खरब पृथ्वी सामावतील. स्टारफॅक्ट्स या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, जर स्टीफेन्सन २-१८ ला आपल्या सूर्यमालेमध्ये बसवलं तर त्याचा आकार एवढा मोठा आहे की तो युरेनस ग्रहापर्यंतच्या सूर्यमालेच्या कक्षांना आपल्यामध्ये सामावून घेईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com