Video Viral: एअरपोर्टवर प्रवाशाला Heart Attack; CISF जवानाने वाचवला जीव

या घटनेचा व्हिडिओ सीआयएसएफच्या सोशल अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय.
cisf jawan
cisf jawansakal

सोशल मीडियावर जवानांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही भावनिक असतात. असाच एक जवानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. एका सीआयएसएफच्या जवानाने थेट एअरपोर्टवरचं एका प्रवाशाचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सीआयएसएफच्या सोशल अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय.

cisf jawan
Viral Video : खतरों के खिलाडी! चक्क ११ हजार वोल्टच्या विजेच्या तारांवर घेतोय झोका

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती स्ट्रेचरवर झोपलेला आहे आणि जवान त्याच्या छातीवर हात ठेवून दाब देतोय. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय.

चेन्नईच्या विमानतळावरील हा व्हिडीओ आहे. या विमानतळावर अचानक एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला. त्यावेळी तेथे सीआयएसएफ जवान उपस्थित होते. या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता प्रवाशाला स्ट्रेचरवर झोपवलं आणि त्या प्रवाशाच्या छातीवर एका जवानाने हाताने सलग दाब दिला. विशेष म्हणजे यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला.

cisf jawan
Video Viral : मिठाई बनवताना झाडूने पाठ खाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले

सध्या या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडिओ पाहून जवानाचे कौतुक करत आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com