Eiffel Tower Lightning Strike Video Goes Viral
esakal
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरवर वीज कोसळल्याचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटादरम्यान टॉवरच्या टोकावर वीज कोसळली. काही क्षणांसाठी संपूर्ण आयफेल टॉवर तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.