Video : बसमध्ये गर्दीचा फायदा घेत तरुणीला चुकीच्या जागी केला स्पर्श; तिने पुढे जे केलं...; मुलींनी तर बघायलाच हवा हा व्हिडिओ

Viral Video Girl Slap man molestation in bus : गर्दी असलेल्या बसमध्ये तरुणीसोबत छेडछाड करणाऱ्या समाजकंटकाला तिने जाहीरपणे धडा शिकवला. हा व्हायरल व्हिडीओ झाला आहे.
Crowded bus harassment Woman slaps molester video viral
Crowded bus harassment Woman slaps molester video viralesakal
Updated on
Summary
  • बसमध्ये तरुणीला छेडणाऱ्या व्यक्तीला तिने धाडसी प्रतिकार करत जाहीरपणे धडा शिकवला.

  • व्हायरल व्हिडीओने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला.

  • तरुणीच्या धैर्याने समाजाला स्वसंरक्षण आणि न्यायासाठी प्रेरणा दिली.

molestation video : सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गर्दीचा फायदा घेत एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या समाजकंटकाला त्या तरुणीने जाहीरपणे चांगलाच धडा शिकवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रत्येकाने पाहावा असा हा धाडसी प्रतिकाराचा क्षण आहे. या घटनेने समाजातील काही विकृत मानसिकतेच्या लोकांना चांगलाच इशारा दिला आहे की, आता तरुण्या मूकपणे सहन करणार नाहीत, तर त्यांच्याविरुद्ध ठामपणे उभ्या राहतील.

हा धक्कादायक प्रकार एका चालत्या बसमध्ये घडला. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती तरुणीच्या शेजारी बसलेली आहे. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत असताना, हा व्यक्ती हळूहळू त्या तरुणीला अश्लील पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. तो मुद्दाम आपल्या हाताच्या कोपराने तरुणीच्या छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या तरुणीने आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने हा सर्व प्रकार लक्षात घेतला. मैत्रिणीने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड केला आणि योग्य वेळी कारवाई केली.

Crowded bus harassment Woman slaps molester video viral
Nag Panchami Shirala Video : भस्म..गळ्यात कवट्यांची माळ..! शिराळ्यात अवतरले नागा साधू, सुरू झाली थरारक नागपंचमीची मिरवणुक, VIDEO

व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं की, ही तरुणी सीटवरून उठली आणि त्या व्यक्तीच्या कानाखाली जोरदार लगावली. यानंतर ती मोठ्या आवाजात त्या व्यक्तीला त्याच्या किळसवाण्या कृत्याबद्दल जाब विचारू लागली. बसमधील इतर प्रवाश्यांनीही या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या तरुणीला पाठिंबा दिला. सुरुवातीला आपली चूक मान्य करण्यास नकार देणारा तो व्यक्ती शेवटी हात जोडून माफी मागताना दिसला. या संपूर्ण घटनेने उपस्थित प्रवाश्यांनाही धक्का बसला, पण तरुणीच्या धाडसाला सर्वांनीच दाद दिली.

Crowded bus harassment Woman slaps molester video viral
Gold producing bacteria : माती खाऊन बाहेर टाकतो २४ कॅरेट सोनं..! शास्त्रज्ञांना सापडला 'हा' अद्भुत बॅक्टेरिया

हा व्हिडीओ '@IndiaObserverX' या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, तो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या तरुणीच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, "या तरुणीला सलाम! तिच्या धाडसाने सर्व मुलींना प्रेरणा मिळेल." दुसऱ्या एका युजरने म्हटलं, "जर बसमधील इतर प्रवाश्यांनीही त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला असता, तर असे समाजकंटक पुन्हा असं कृत्य करायची हिम्मत करणार नाहीत."सार्वजनिक ठिकाणी महिलांवरील अशा अत्याचारांच्या घटना नवीन नाहीत. रस्त्यावरून चालताना छेडछाड, अपशब्दांचा वापर, पाठलाग असे प्रकार अनेकदा समोर येतात. मात्र, अशा घटनांविरुद्ध आता तरुण्या अधिक सजग आणि धाडसी बनताना दिसत आहेत.

Crowded bus harassment Woman slaps molester video viral
Video : दोन बायका फजिती ऐका! अंध भिकाऱ्याने केली 2 लग्न अन् पुढे जे झालं...धक्कादायक घटना व्हायरल

FAQs

  1. What happened in the viral video involving a woman on a bus?
    व्हायरल व्हिडीओमध्ये बसमधील तरुणीबाबत काय घडलं?
    -बसमध्ये एका व्यक्तीने तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण तिने धाडस दाखवत त्याला जाहीरपणे कानाखाली लगावली आणि जाब विचारला.

  2. How did the woman respond to the harassment?
    तरुणीने छेडछाडीला कसा प्रतिसाद दिला?

    -तरुणीने त्या व्यक्तीला थेट कानाखाली मारली आणि मोठ्या आवाजात त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला, ज्यामुळे तो माफी मागताना दिसला.

  3. Why is this video considered inspiring?
    हा व्हिडीओ प्रेरणादायी का मानला जातो?

    -हा व्हिडीओ तरुणीच्या धैर्याचे आणि स्वसंरक्षणासाठी उभे राहण्याच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे, जे इतरांना प्रेरणा देते.

  4. What was the reaction of netizens to this video?
    नेटकऱ्यांनी या व्हिडीओला काय प्रतिसाद दिला?

    नेटकऱ्यांनी तरुणीच्या धाडसाचं कौतुक केलं आणि अशा समाजकंटकांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.

  5. What does this incident highlight about public safety?
    ही घटना सार्वजनिक सुरक्षेबाबत काय दर्शवते?

    ही घटना सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बसमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा अभाव आणि त्याविरुद्ध लढण्याची गरज अधोरेखित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com