SmartPhone मधून कसे व्हायरल होतात MMS ? 'या' चुका टाळत व्हा सावध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How do MMS viral? Dont do these things

SmartPhone मधून कसे व्हायरल होतात MMS ? 'या' चुका टाळत व्हा सावध

Technology Tips: अलीकडेच मोहाळी प्रकरणात व्हायरल झालेल्या एमएमएसमुळे सोशल मीडियासोबत समाजातही मोठा दंगा झाला होता. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकारणाच्या तळाशी जाण्यासाठी अजूनही तपास सुरू आहे. अनेक लोकांच्या मनात या धक्कादायक प्रकरणानंतर एमएमएस कसे व्हायरल होतात याबाबत आता प्रश्नही निर्माण झाले आहेत. तुमच्याच काही चुकांमुळे तुमचे प्रायवेट व्हिडिओ किंवा एमएमएस व्हायरल होऊ शकतात.

कसे व्हायरल होतात MMS?

MMS व्हायरल होण्याचं कुठलं एक कारण नसून अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे प्रायवेट व्हिडिओज किंवा एमएमएस व्हायरल होत असतात. यातील पहिलं कारण फार सामान्य आहे. ते असं की, एमएमएस मुद्दाम वेबसाईटवर टाकले जातात. अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर द्वेषभावनेने प्रायव्हेट व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर अथवा लिक केले जातात. या विषयावर कितीतरी रिपोर्ट्स दरवर्षी येत असतात.

मात्र या कारणाव्यतिरिक्त एमएमएस व्हायरल होण्याची टेक्नीकल कारणंही आहेत.

थर्ड पार्टी ॲपपासून राहा सावध

थर्ड पार्टी ॲपमुळे तुम्हाला माहिती न होता तुमचा प्रायव्हेट व्हिडिओ लिक होऊ शकतो. थर्ड पार्टी ॲप तुमच्याकडून अनेक प्रकारच्या पर्मिशन घेत असतात. यामधूनच त्यांना डिवाईस फाईलचाही ॲक्सेस सहज मिळून जातो.

हेही वाचा: 'Technology'ने ओळख बनवल्यास 'Mobile Apps' मिळवून देतील 20 लाखांपर्यंत पगार

या ॲपद्वारे तुमच्या फाइल्सला कमांड देत कंट्रोल केल्या जातं. त्यानंतर तुमच्या फाइल्समधून प्रायवेट व्हिडिओ पॉर्न साईटवर लिक केले जातात. त्यामुळे कुठलाही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याआधी त्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे असते. विशेषत: असे ॲप्स जे तुम्हाला पर्मिशन मागत असतात.

हेही वाचा: MMS Video वर भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगने सोडलं मौन;म्हणाली,'मी रडणार नाही,कारण..'

फोन विकण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी

अनेकदा जेव्हा तुम्ही तुमचा फोन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विकता तेव्हा तुमच्या फोनमधील फाईल्स लिक होण्याची शक्यता असते. फोन फॉरमॅट जरी मारला असला तरी डिलीट झालेला डेटा पुन्हा रिकव्हर केला जाऊ शकतो. त्यामुळे विकण्याआधी सगळ्या फाईल्स डिलीट करण्याची गरज असते.

बहुतेकदा तुम्ही जेव्हा फोनचा बॅकअप ऑन ठेवता तेव्हा या फाइल्सचा बॅकअप गूगल ड्राइव्ह किंवा दुसऱ्या ड्राइव्हवर जाऊ शकतो. त्यामुळे याचा ॲक्सेस पुढल्या व्यक्तीच्या हाती लागू शकतो. याच कारणाने थर्ड पार्टी ॲप किंवा वेबसाईटलाही त्याचा ॲक्सेस मिळू शकतो. आणि तेथे डाऊनलोड केलेले व्हिडिओ लीक होऊ शकतात.

असे करा क्रॉस चेक

गूगल ॲक्टिविटी मध्ये जाऊन आधी चेक करा की तुम्ही कुठल्या अननोन वेबसाईटला तुमचा ॲक्सेस तर देत नाहीये ना.

Web Title: How Does Private Videos Or Mms Leaked Online On Porn Sites From Your Smartphone

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..