Leopard Video : बिबट्याचा स्थानिकांकडून क्रूरपणे छळ; शेपटी ओढत पकडलं अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Video

Leopard Video : बिबट्याचा स्थानिकांकडून क्रूरपणे छळ; शेपटी ओढत पकडलं अन्...

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकवेळा विनोदी आणि डान्सचे व्हिडिओ तरूणाईचे मनोरंजन करत असतात. सध्या एका गावातील व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल होत असून स्थानिक लोकं बिबट्याला क्रूरपणे पकडताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण हा व्हिडिओ उत्तर भारतातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गावकरी त्याला मारण्याचा प्रयत्न करत असून जाळीमध्ये पकडताना या व्हिडिओत दिसत आहे. गावकऱ्यांनी बिबट्याला दिलेली ही वागणूक चांगली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

हा बिबट्या थकलेल्या असावा अशी शक्यता आहे. रणजित जाधव यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्वीटरवरून शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी या गावकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला या व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.