मानलं या अवलियाला; 15 वर्षांपासून रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचं घडवतोय भवितव्य

रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना या महान व्यक्तीने शिक्षणाची ओढ लावली आहे
A man gave path to many beggar Childerns
A man gave path to many beggar Childerns esakal

Human Interest Story: भारतात दरवर्षी गरीबीमुळे कित्येक मुलांवर भीक मागण्याची पाळी येते. दोन वेळच्या जेवणाची सोय लावण्यासाठी दिवसभर ही पोरं रस्त्यावर भीक मागत भटकत असातात. अशांना तात्पुरती मदत करणारे भरपूर असतात. मात्र त्यांच्या भविष्याचा विचार करणारे त्यांना फार कमी लाभतात. मात्र एका महान व्यक्तीने भीक मागणाऱ्या पोरांची जबाबदारी घेत त्यांचं भविष्य सुधारलं आहे. होय! भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षण देत नरेश पारस यांनी त्यांचं भविष्य सुधारलं आहे.

रस्त्यावर भीक मागणारी मुलं निराधार, गरीब असतात आणि हेच रस्त्यावर भीक मागण्याचं एक मोठं कारण असतं. अशांना शाळा शिकणं तर फार दूरच राहिलं पण दोन वेळच्या खाण्यासाठीही दिवसभर भटकावे लागते. काही महिन्यांपूर्वी जेव्हा दहावीचा निकाल लागला तेव्हा एका सामान्य विद्यार्थ्याची फार चर्चा सुरू होती. दहवीत केवळ ६३ टक्के मिळवून त्याचं एवढं कौतुक होण्यामागे नक्कीच एक मोठं कारण होतं. जगासाठी ही टक्केवारी सामान्य असली तरी या विद्यार्थ्याने त्याच्या आयुष्यात मिळवलेलं हे मोठं यश होतं.

शेर अली असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. भीक मागत आणि कचरा उचलत हे मुल त्याचा उदनिर्वाह करायचं. इतर मुलांप्रमाणे शेर अली देखील रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि कचरा उचलणाऱ्या सामान्य मुलांप्रमाणेच राहिला असता. मात्र नरेश पारस यांनी या मुलाच्या जीवनाला नवं वळण दिलं. केवळ शेर अलीच नाही तर अशा अनेक मुलांना नरेश यांनी शिक्षणाची दारं उघडी करून दिली आहेत.

१५ वर्षांपासून करताय मोलाचं कार्य

उत्तर प्रदेशच्या आग्रामधील इंदिरा नगरच्या मारवाडी परिवारातील अनेक गरीब पोरांना नरेश यांनी शिक्षणाचे धडे देत त्यांचं आयुष्य सुधारलं आहे. एवढंच नव्हे तर RTIच्या मदतीने त्यांनी अनेक बेपत्ता मुलांचा शोध लावत त्यांना त्यांच्या आईवडिलांकडे सोपवले आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकही मुलगा अशिक्षित राहू नये असं त्यांचं स्वप्न आहे. आणि ते एक दिवस नक्कीच सत्यात उतरणार असल्याचा विश्वासही त्यांना आहे.

अत्याचार किंवा लैंगिक शोषाणाच्या बळी ठरलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठीही नरेश पारस ओळखल्या जातात. वेश्याव्यवसायात बळजबरी पाठवलेल्या मुलींनाही या व्यक्तीने त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचवलंय. नरेशच्या निस्वार्थ देशसेवेच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com