Budget Picks : बजेटआधी कमाईची संधी, 'हे' शेअर्स खरेदी करा, तज्ज्ञांचा सल्ला

Budget 2022
Budget 2022

Budget Picks: तुम्ही बजेटपूर्वी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओसाठी चांगले स्टॉक शोधत असाल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. 3 शेअर बाजार तज्ज्ञांनी शेअर्स खरेदी करण्यासाठी लिस्ट दिली आहे. हे शेअर्स कोणते आहेत आणि त्यासाठी काय टारगेट देण्यात आले आहे ते जाणून घेऊया.

Budget 2022
मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत घट

फोर्टिस हेल्थकेअर (Fortis Healthcare)

बाजार तज्ज्ञ अविनाश गोरक्षकर यांनी फोर्टिस हेल्थकेअरमध्ये (Fortis Healthcare) शेअर खरेदीचा सल्ला देताना येत्या एका वर्षासाठी 350/360 रुपयांचे टारगेट दिले आहे. फोर्टिस हेल्थकेअरला त्यांच्या एक्सांशन प्लानचा सपोर्ट मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. कंपनीचा डायग्नोस्टिक बिझनेससुद्धा आहे, जो SRL डायग्नोस्टिक्स नावाने सुरु आहे.

इंडो कंट्री इंडस्ट्रीज (Indo Count Industries)


सेठी फिनमार्टच्या विकास सेठी यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये इंडो काउंट इंडस्ट्रीजचा समावेश केला आहे. बाजार तज्ज्ञ विकास सेठी यांच्या मते या शेअरचे व्हॅल्युएशन स्वस्त आहे आणि बजेटसाठी हा एक चांगला स्टॉक आहे. त्यांनी पुढील 9-12 महिन्यांसाठी या स्टॉकला 350 रुपयांचे टारगेट दिले आहे. त्यांचे फंडामेंटल्स अतिशय चांगली आहेत. रिटर्न ऑन कॅपिटल एम्‍प्‍लॉयड सुमारे 23-34 टक्के आहे.

Budget 2022
सिमेंट क्षेत्रातील 100 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' शेअर बजेटपूर्वी खरेदी करा

पीएनसी इन्फ्रा (PNC Infra)

मार्केट तज्ज्ञ सिद्धार्थ सेदानी यांनी त्यांच्या बजेट पिकमध्ये PNC इन्फ्राचा समावेश केला आहे. येत्या काळात कंपनीसाठी मजबूत ऑर्डर अपेक्षित आहेत. बजेटसाठी हा सर्वोत्तम स्टॉक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पुढील एक वर्षासाठी स्टॉकवर 389 रुपयांचे टारगेट दिले आहे. कंपनीसाठी यावर्षी आणि पुढील दोन वर्षांसाठी चांगली ऑर्डर बुक अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या एक्झिक्‍यूशनसह बॅलेन्सशीट मजबूत असल्याचे सेदानी यांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com