PM Kisan Samman Nidhi Yojana; शेतक-यांचा विचार करावाच लागेल नाहीतर...

union budget 2021 pm Kisan Samman Nidhi yojana online in union budget 2021 govt may increase yojana amount rs 10000 per year
union budget 2021 pm Kisan Samman Nidhi yojana online in union budget 2021 govt may increase yojana amount rs 10000 per year

मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार हे देशातील शेतक-यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पीएम शेतकरी सन्मान निधी योजना चालवत आहे. त्याचा विचार करुन ती आणखी सक्षम करण्यासाठी आणखी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार देशातील अन्नदात्यांना न्याय देण्यासाठी बजेटमध्ये योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे दिल्लीत शेतक-यांचा उसळलेला आक्रोश. त्याचे पडसाद दिल्लीतील लाल किल्ल्यावर उमटले होते. आता जाहीर होणा-या बजेटमध्ये शेतीसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद झाली नाही तर शेतकरी अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत सरकारनं सहा एकरपेक्षा कमी जमीन असणा-यांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी शेतक-यांना सहा हजार रुपयांचे साह्य करण्यात येणार आहे. सहाय्यता निधी हा दर चार महिन्याला दोन हजार अशा स्वरुपात देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. देशातील शेतक-यांनी शेती विधेयकाला केलेला विरोध आणखीनच तीव्र झाला आहे. प्रजासत्ताक दिनी उसळलेला जनक्षोभ त्याची प्रचिती देणारा होता. त्यामुळे मोदी सरकारला शेतक-यांसाठी काही भरीव तरतूद करावी लागणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

मोदी सरकार यंदाच्या बजेटमध्ये शेतक-यांसाठी सन्मान निधी योजनेत वाढ केली जाणार आहे. आता शेतक-यांना जी रक्कम दिली जाते त्यात वाढ होऊन ती दर महिना 10 हजार रुपये एवढी करण्यात येणार आहे. याशिवाय मोदी सरकारनं शेतक-यांसाठी काही कल्याणकारी योजनांचाही विचार केल्याची माहिती आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर अनेक शेतमजूर आपआपल्या गावी परतले आहेत. त्यांच्यासाठी काही वेगळ्या योजना सुरु करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित जे काही उद्योग आहेत त्यांच्या वृध्दीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याची आत्यंतिक गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागले आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित अशा य़ोजनांवर 19 लाख कोटी रुपयांपर्यत तरतूदीचा विचार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता सध्या त्याची मर्यादा ही 15 लाख कोटी रुपयांपर्यत आहे. त्यात 25 टक्क्यांनी वाढ होणार आहे. याशिवाय पीक विमा योजना, शेतकरी क्रेडिट कार्ड, मृदा योजना यांच्यासहित अनेक योजनांवर भर देण्यात येणार आहे. शेतकरी सन्मान योजनेसाठी कोणीही शेतकरी अर्ज करु शकतो असे त्या नियमावलीत म्हटले आहे. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि बँक खात्याची गरज आहे. 


 तुम्ही जर शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 2 हजार रुपयांच्या हफ्त्याची स्थिती माहिती असेल. त्यासाठी टॉल फ्री नंबर 1800115526 आणि हेल्प लाइन नंबर 155261 वर कॉल करुन त्याची स्थिती माहिती करुन घेता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com