esakal | ऐकलं का..महाराष्ट्रातील स्थलांतरित कष्टकरी निघाले घराकडे!
sakal

बोलून बातमी शोधा

IMG-20200502-WA0050.jpg

लाॅकडाऊनमध्ये मुंबईहून घराकडे निघालेल्यांना नाशिक आणि इगतपुरीमध्ये थांबवण्यात आले. महाराष्ट्रदिनापासून खास रेल्वेने अशांना त्यांच्या घरी पाठवण्यास सुरवात झाली. इगतपुरीहून धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिमचे कष्टकऱयांचा घराकडे आज सायंकाळी रवाना झाले.

ऐकलं का..महाराष्ट्रातील स्थलांतरित कष्टकरी निघाले घराकडे!

sakal_logo
By
महेंद्र महाजन : सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी (नाशिक) ः लाॅकडाऊनमध्ये मुंबईहून घराकडे निघालेल्यांना नाशिक आणि इगतपुरीमध्ये थांबवण्यात आले. महाराष्ट्र दिनापासून खास रेल्वेने अशांना त्यांच्या घरी पाठवण्यास सुरवात झाली. इगतपुरीहून धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिमचे कष्टकऱयांचा घराकडे आज सायंकाळी रवाना झाले.

आता इगतपुरीमध्ये बिहारमधील एक कष्टकरी उरला

नाशिक शहर आणि जिल्ह्यातील २८ निवारा केंद्रांमधून जवळपास १ हजार ९३८ स्थलांतरित कष्टकऱयांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अगदी सुरवातीच्या काळात इगतपुरीमधील एकलव्य आश्रमशाळेतील कष्टकऱयांनी घराकडे जाण्यासाठी टोकाचा आग्रह धरला. लाॅक डाऊन-२ सुरु झाल्यावर समुपदेशनाची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली होती. त्यामुळे घराच्या आग्रहातून भोजन न करण्याच्या संकल्पापासून कष्टकरी परावृत्त झाले. पहिल्यांदा मध्यप्रदेशातील आणि आज उत्तर प्रदेशमधील कष्टकरी रवाना झाल्यावर प्रांत तेजस चव्हाण आणि तहसिलदार अर्चना पागेरे यांनी जिंदाल पाॅलीफिल्म यांच्याकडून दोन बसगाड्या घेतल्या. त्यामध्ये धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ४७ कष्टकऱयांच्या प्रवासाला सायंकाळपासून सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता इगतपुरीमध्ये बिहारमधील एक कष्टकरी उरला आहे. त्याच्यासाठी प्रशासनातर्फे मदतीची व्यवस्था सुरु आहे.

निवारा केंद्रांमध्ये शिल्लक कष्टकऱयांची संख्या

महाराष्ट्र ः ५२

उत्तरप्रदेश ः १०९

मध्यप्रदेश ः ४९

राजस्थान ः ७६

बिहार ः १६

गुजरात ः ८

आेरिसा ः ८

छत्तीगसड ः ६

याशिवाय नेपाळमधील एक, पश्चिम बंगाल आणि केरळमधील प्रत्येकी दोन, उत्तराखंडमधील तीन, आंध्रप्रदेशमधील दोन, झारखंड आणि तेलंगणामधील प्रत्येकी एक कष्टकरी निवारा केंद्रात आहेत.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

रेल्वेने मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशकडे रवाना झालेल्या स्थलांतरित कष्टकऱयांना हेमंत सांगळे यांनी ३ हजार पाण्याच्या बाटल्या दिल्या आहेत. त्याचवेळी प्रत्येकाला भोजन आणि नाश्त्याचे पार्सल देण्यात आले आहे. सव्वा महिन्याच्या पाहुणचारामुळे जिल्हा प्रशासन आणि नाशिक महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱयांशी स्थलांतरित कष्टकऱयांचे स्नेहाचे बंध तयार झाले होते. त्यामुळे घरी रवाना होताना अनेक जण भावूक झाले असले, तरीही घरी जाण्याची ओढ प्रत्येकामध्ये होती. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! कुणीतरी वाचवा हो, माझ्या बाळाला!...काळजाच्या तुकड्याला रक्ताच्या थारोळ्यात बघून मातेचा आक्रोश..