अतिवृष्टीने उत्तर महाराष्ट्रात ७९ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान; पंचनाम्याची कामे सुरु

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 25 September 2020

उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सर्वाधीक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा नगर जिल्ह्याला बसला आहे त्याखालोखाल धुळे ,नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पिकांना पावसाचा फटका बसला.

नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील ५४ तालुक्यापैकी ३२ तालुक्यांत ७९ हजार ७८० हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राची प्राथमिक माहीती पुढे आली आहे. महसूल यंत्रणेकडून पंचनाम्याची कामे सुरु आहेत. 

शासनाकडे माहीती पाठवली

उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सर्वाधीक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा असणारा नगर जिल्ह्याला बसला आहे त्याखालोखाल धुळे ,नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील पिकांना पावसाचा फटका बसला. पाचही जिल्ह्यांमध्ये भात मका ज्वारी कापूस तूर सोयाबीन भुईमूग उडीद बाजरी कांदा टोमॅटो मिरची केळी द्राक्षे डाळिंब व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने शासनाकडे माहीती पाठविण्यात आली आहे.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या भागात काही ठिकाणी पिके संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात मका द्राक्षे बाजरी गहू भाजीपाला भुईमूग याचे नुकसान झाले आहे तर धुळे जिल्ह्यात मका ज्वारी तुर भुईमूग बाजरी कांद्याचे नुकसान झाले आहे नंदुरबार जिल्ह्यात भात मका ज्वारी उडीद त्याचे नुकसान झाले आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये विशेष करून केळीला पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे अहमदनगर जिल्ह्यात गहू बाजरी ज्वारी मका सोयाबीन भुईमूग डाळिंबाचे नुकसान झाले. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

जिल्हा तालुके हेक्टर क्षेत्र 
नाशिक - १०, ३७८२९.६९ 
धुळे - २, ६५९५.४७ 
नंदुरबार  - ५,  ४३६४.०० 
जळगाव -  ४,  ४२५६.८७ 
नगर - ११,  २६७३४.१० 

एकूण - ३२, ७९७८०.१३ हे 

 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 89 hectors crops damaged due to heavy rains nashik marathi news