महावितरण विरोधात भाजपाचे "टाळे ठोको व हल्लाबोल" आंदोलन 

प्रमोद दंडगव्हाळ
Friday, 5 February 2021

राज्य सरकारने व वीजवितरण कंपनीने जनतेला लॉकडाऊन मध्ये भरमसाठ वाढीव वीजबिल दिल्यामुळे जनतेला  नाहक त्रास सहन करावा लागला आहे यातील अनेक लोकांना हे वाढीव वीजबिल कसं भरावं? असा प्रश्न पडलेला असताना हे वाढीव विजबील वीजवितरण कंपनीने सक्तीने वसुल करावे असे आदेश या राज्य सरकारने दिले आहे.

नाशिक : महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या व महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आज भाजपातर्फे राज्यभर भारतीय जनता पार्टी सिडको मंडल 2 मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर "टाळा ठोको व हल्लाबोल" आंदोलन आयोजित केले होते.

महावितरण केंद्रांवर "टाळा ठोको व हल्लाबोल"
राज्य सरकारने व विजवितरण कंपनीने जनतेला लॉकडाऊन मध्ये भरमसाठ वाढीव वीजबिल दिल्यामुळे जनतेला  नाहक त्रास सहन करावा लागला आहे यातील अनेक लोकांना हे वाढीव वीजबिल कसं भरावं? असा प्रश्न पडलेला असताना हे वाढीव विजबील विजवितरण कंपनीने सक्तीने वसुल करावे असे आदेश या राज्य सरकारने दिले आहे. या राज्य सरकारच्या दडपशाही व हिटलरशाही विरुद्ध राज्य सरकारची व विजवितरण कंपनीची दडपशाही थांबवावी तसेच वाढिव वीजबिल कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा याकरता आज शहराध्यक्ष गिरीष पालवे, आमदार सीमा हिरे, शहर सरचिटणीस जगन पाटील, महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
विजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

कुलूप लावून निषेध
 भारतीय जनता पार्टी सिडको मंडल 2 मध्ये असलेल्या  महावितरण MSEB  कार्यालया समोर खालील ठिकाणी  निषेध आंदोलन करण्यात आले
1) MECB ऑफिस मयूर हॉस्पिटल हॉस्पिटल समोर सकाळी 10 वाजता
2) MECB ऑफिस हेडगेवार चौक सकाळी 11 वाजता
3) MECB ऑफिस सिंबोसिस कॉलेज जवळ 12 वाजता 
4). MECB ऑफिस एमआयडीसी अंबड 12:30 वाजता कुलूप लावून निषेध करण्यात आला .

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित
यावेळी शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील महेश भाऊ हिरे मंडल अध्यक्ष अविनाश पाटील सरचिटणीस दिनेश मोडक नगरसेविका अलकाताई अहिरे प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, नगरसेवक राकेश भाऊ दोंदे, कैलास आहिरे उखाजी चौधरी, आत्माराम मटाले, योगेश मोरे, सुरेश गांगुर्डे, राकेश ढोमसे आदी नगरसेवक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP agitation against MSEDCL cidco nashik marathi news