सीए अंतिम परीक्षा : नाशिकचा कुशल लोढा देशात पाचवा 

kushal lodha 123.png
kushal lodha 123.png

नाशिक : चार्टर्ड अकौंटंट (सीए)च्या नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या जुन्या व नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. 16) जाहीर करण्यात आला. त्यात नाशिकच्या कुशल लोढाने देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे यश मिळविले. देशात गुरुम नागाश्री कृष्णा प्रचित (विजयवाडा) याने 577 गुण मिळवून प्रथम, वरदा के. पी. मन्नरकडने 548 गुण मिळवून द्वितीय, धवल कपूरचंद चोप्राने 531 गुण मिळवून तृतीय क्रमांकाच्या यशाला गवसणी घातली. 

राष्ट्रीय स्तरावर पाच जणांची अन्‌ जुन्या अभ्यासक्रमात एकाची बाजी 

राष्ट्रीय स्तरावरील निकालात नाशिकच्या पाच जणांनी, तर जुन्या अभ्यासक्रमात एकाने बाजी मारली. त्यामध्ये कुशल संतोष लोढा (566 गुण), हर्षली सुनीलकुमार सोनी (461 गुण), सोनाली मुकेश हरजानी (421 गुण), अंकिता रवींद्र कोलते (419 गुण), रितेश उमेदमल सुतार (407 गुण) यांचा समावेश आहे. जुन्या अभ्यासक्रमात वैष्णवी संतोष केला (402 गुण) उत्तीर्ण झाली. देशात डिसेंबर 1949 पासून चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षा मे आणि नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा देश आणि जगातील 43 हजार 717 विद्यार्थ्यांनी दिली. त्यांपैकी अंतिम परीक्षेत 326 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिकच्या काजल चांडक, प्रसाद जामदार, सागर ढगे, प्रतीक जालोरी, भाग्यश्री भंडारी, दीपक कड याही विद्यार्थ्यांनी सीए अंतिम परीक्षेत यश मिळविल्याची माहिती प्रा. लोकेश पारख यांनी दिली. 

सीए परीक्षेत नाशिकचा निकाल उंचावला..

सीए अंतिम परीक्षेत नाशिकमध्ये पहिल्यांदा देशातून पाचव्या क्रमांकाचे नाशिकने मिळविले आहे. कुशल लोढाने देशात पाचव्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकाचे यश मिळविले. जीएसटी व आगामी नवीन प्राप्तिकर रचनेतील बदलांसाठी सीएची आवश्‍यकता आहे. अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत नाशिकचा निकाल उंचावला आहे. - प्रा. लोकेश पारख, सचिव, नाशिक जिल्हा कोचिंग क्‍लासेस संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com