मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा; भाजप कार्यालयासमोर आक्रमक मोर्चा

maratha samaj.jpg
maratha samaj.jpg

नाशिक : सत्ताधारी असो कि विरोधक असा भेदभाव न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व राज्य सरकारकडे विशेष अधिवेशन बोलविण्यासाठी दबाव आणावा अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात आल्यानंतर पोलीसांनी नोटीस मागे घेतली. 

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा 
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य भर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जात आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील समन्वयकांच्या बैठकीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाचं एक भाग म्हणून आज भाजपच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून आंदोलन करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांना निवेदन देण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला जबाबदार कोण यावर आता चर्चा नको, सर्वचं पक्षांच्या आमदार, खासदारांनी आरक्षणाची जबाबदारी घेणे महत्वाचे आहे. मराठा समाजाने जाती-पातींचा विचार न करता प्रत्येकाला निवडून दिले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला देण्यासाठी सर्वांनी आवाज उठविला पाहिजे.

भाजप कार्यालयासमोरील आंदोलनात क्रांती मोर्चा आक्रमक 

मराठा आरक्षणासाठी पक्षीय विचार सरणी बाजूला ठेवून राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पत्र लिहून दोन दिवसीय अधिवेशनाची मागणी कर वी तसेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी पुर्नयाचिका दाखल करावी, आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती करू नये, राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलाव्या, ईडब्ल्युएस मध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये, आदी मागण्या पत्राच्या माध्यमातून कराव्या असे निवेदनात म्हटले. 
आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, शिवाजी सहाणे, चेतन शेलार, शरद तुंगार, सचिन पवार, ज्ञानेश्वर थोरात, विजय खर्जुल, निलेश गायखे, तुषार भोसले, ज्ञानेश्वर कवडे, पूजा धुमाळ, मंगला शिंदे, माधवी पाटील, अस्मिता देशमाने आदी सहभागी झाले होते. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

केंद्राकडे पाठपुरावा 
भाजपचे खासदार भारती पवार, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीज पालवे,सभागृह नेते सतीश सोनवणे, महेश हिरे, जगन पाटील, सुनील केदार, प्रशांत जाधव, अमित घुगे यांनी स्वीकारले. यावेळी बोलतांना खासदार पवार यांनी मराठा आरक्षणासाठी खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी जी भूमिका घेतली त्या सोबत आम्ही आहोत. पक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com