आपली लेक मृत्यूच्या दाढेत ओढताना पाहून.. माऊलीनेही स्वत:ला दिले झोकून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

हतगड येथील धरणाच्या बाजूस असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी कांता पिठे आपली मुलगी जया हिच्यासमवेत गेल्या होत्या. या वेळी विहिरीच्या कठड्यावर बसून कपडे धुत असताना जया हिचा पाय घसरून ती विहिरीत पडली. त्यानंतर...

नाशिक/ बोरगाव : हतगड (ता. सुरगाणा) येथील धरणाच्या बाजूस असलेल्या विहिरीत पाय घसरून पडल्याने मायलेकीचा मृत्यू झाला. कांता पिठे (वय 45) व जया पिठे (10) असे मृत विवाहिता आणि तिच्या मुलीचे नाव आहे.

असा घडला दुर्दैवी प्रकार

हतगड येथील धरणाच्या बाजूस असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी कांता पिठे आपली मुलगी जया हिच्यासमवेत गेल्या होत्या. या वेळी विहिरीच्या कठड्यावर बसून कपडे धुत असताना जया हिचा पाय घसरून ती विहिरीत पडली. मुलगी विहिरीत पडल्याचे दिसताच तिला वाचविण्यासाठी आई कांता यांनीही विहिरीत उडी मारली. मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. जया हातगड येथील आश्रमशाळेत चौथीत शिकत होती. याप्रकरणी बोरगाव आउटपोस्ट पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death after falling into a well at surgana nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस