"खाजगी हॉस्पिटलवर बारकाईने लक्ष ठेवा" - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

 राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (ता. 8) नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. नाशिकसह जळगाव व धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राज्यभरातील दौऱ्यात सरकारवर टीका करणारे फडणवीस काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन सोबत आहेत

नाशिक : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (ता. 8) नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिक शहर व उत्तर महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती व उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. नाशिकसह जळगाव व धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राज्यभरातील दौऱ्यात सरकारवर टीका करणारे फडणवीस काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन सोबत आहेत

काय म्हणाले फडणवीस.. जिल्हा रुग्णालयात पाहणी व आढावा

- खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल कोविड रुग्णांचे बिलिंगबाबत समिती नेमून त्याबाबत कारवाई करावी
- खाजगी हॉस्पिटलवर बारकाईने लक्ष्य ठेवा
- ग्रामीण भागातील रुग्णांची देखभालीचे उत्तम नियोजनाबाबत समाधान
-जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित महिलांची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्याचे दौरे करीत आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदांमधून केला आहे. नाशिक शहरातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने त्यामुळे उपाययोजनांची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारवर टीका करताना महापालिकेसंदर्भात ते काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

आज (ता. 8) फडणवीस सकाळी नाशिकला आले. सकाळी अकराला त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर बिटको रुग्णालयातील कोविड सेंटरची ते पाहणी केली. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्तांशी चर्चा करणार असून. दुपारी तीनला मालेगाव महापालिकाहद्दीत ते पाहणी करतील. दुपारी साडेचारला एम.एस.जी. महाविद्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर धुळे, जळगावकडे प्रयाण होईल. 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis at nashik marathi news