जेव्हा जिल्हाधिकारी कौतुकाने चिमुकल्यांना म्हणतात, "बाळांनो घराच्या बाहेर निघू नका"

mandhre with chaitanya.jpg
mandhre with chaitanya.jpg

नाशिक :  भारतासह जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच नाशिकमध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने इथेही धाकधूक वाढली आहे.अशातच नाशिकमध्ये राहणाऱ्या चैतन्य उर्फ ( शाहु ) याने तसेच त्याच्या कुटुंबियांकडून सर्वांनाच कौतुक वाटेल अशी कामगिरी केली आहे. यावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनाही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहवले नाही. तसेच त्याला काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

चैतन्यची कौतुकास्पद कामगिरी

चैतन्य ( शाहु ) याचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता आपल्या जमवलेल्या खाऊच्या पैशातून वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधिस 11111/- रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना चैतन्यने दिला. मागील वर्षी कोल्हापुर येथील पुरगृहस्थानां मदत म्हणून असेच खाऊचे पैसे दिले होते. सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांनाआठवताच हे त्यांनी चिमुकल्या शाहू व तेजस्विचे खुप कौतुक केले.  शाहुबाळा आता परत घराच्या बाहेर निघू नकोस व काळजी घ्या असे आवर्जून सांगितले.

कामाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता - जिल्हाधिकारी 

कोरोना विषाणूमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन करतानाच सोसायटीच्या आवारात क्लबहाउस आणि बगीचा अशा ठिकाणीही मुलांनी व सदस्यांनी एकत्रित येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्याने आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इत्यादी गोष्टींची मागणी एकत्रित करावी व त्यानुसार जवळच्या ठिकाणाहून किराणा व भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू मागवून घेणे. त्यानंतर या वस्तू योग्य ती खबरदारी घेऊन प्रत्येक सदस्याच्या घरी सुरक्षारक्षकांमार्फ त पोहोच कराव्यात किंवा प्रत्येक घरातील एक सदस्यास बोलावून गेटवरच त्याचे वाटप करावे, मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कामाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच सोसायटीचे क्लबहाउस, बगीचा येथे सदस्य किंवा लहान मुले एकत्र येणार नाहीत, याबाबत योग्य ती दक्षता घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यांनी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com