वीस वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेलेली मुकबधीर 'गीता' शोधतेय आई-वडिलांना; नाशिकमध्ये शोध सुरू

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Thursday, 17 December 2020

बोलता न येणारी (मुकी) असणारी वीस वर्षांपूर्वी चुकून रेल्वे बसलेली गीता थेट दिल्लीला जाऊन पोहोचली. याठिकाणी दिल्लीहून समझोता एक्सप्रेसने गीता पाकिस्तानात गेली. आणि मग....

नाशिक रोड : वीस वर्षांपूर्वी भारतातून चुकीने रेल्वेत बसून दिल्ली आणि त्याठिकाणाहून पाकिस्तान येथे गेलेल्या गीता नावाच्या (वय २८) मुलीच्या आई-वडिलांचा सध्या नाशिकमध्ये शोध सुरू असून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे दिंडोरीच्या एका पित्याने ही मुलगी आपलीच असल्याचा दावा केला आहे. मात्र वैद्यकीय अहवाल मधील डी एन ए तपासणी जुळत नसल्याने या व्यक्तीचा दावा फोल ठरला आहे. नेमके काय प्रकरण आहे वाचा पुढे...

वीस वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात जाऊन पोहचली 'गीता' अन् मग....
बोलता न येणारी (मुकी) असणारी वीस वर्षांपूर्वी चुकून रेल्वे बसलेली गीता थेट दिल्लीला जाऊन पोहोचली. याठिकाणी दिल्लीहून समझोता एक्सप्रेसने गीता पाकिस्तानात गेली. पाकिस्तानातील ईदी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने गीताचा सांभाळ केला. 2015 साली केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व्यक्तींना भारतात आणले होते. अशा व्यक्तींचा सांभाळ मूकबधिर सामाजिक संस्था करत आहेत.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

गीताच्या आई-वडिलांचा शोध नाशिकमध्ये

गीताने केलेल्या विश्लेषण नुसार ती ज्यावेळी चुकली. त्यावेळी रेल्वेस्थानकाजवळ पूल होता, उसाची शेती होती, त्याचप्रमाणे शेतांमधून शेंगांचे पीक घेतले जायचे. याच आधारे मूकबधिर मुलांवर काम करणारे ज्ञानेन्द्र पुरोहित यांनी गीताला नाशिकमध्ये आणले असून सामाजिक कार्यकर्ते गीताच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील एका व्यक्तीने ही आपली मुलगी असल्याचे सांगितले. पण वैद्यकीय अहवाल मधील डी एन ए मिळत नसल्याने या व्यक्तीचा दावा फोल ठरला आहे. म्हणून गीताच्या आईचा शोध सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया घडल्यानंतर गीताला आई वडिल मिळणार आहे. यासाठी नाशिक रोड येथील सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, गणेश उनवणे हे प्रयत्न करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Geeta searching parents in nashik who come from Pakistan marathi news