esakal | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाच हजार प्लाझ्मा दात्यांची यादी...५ हजार व्यक्तींना केले प्रोत्साहित
sakal

बोलून बातमी शोधा

plazma.jpg

कोरोना संसर्गावर तुर्त कुठलेही प्रभावी औषध नसले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा काढून उपचार करता येत असल्याने त्यादृष्टीने कोरोना संदर्भातील भिती दुर करण्यसाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे. कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचा शोध घेवून त्यांची संमती घेवून प्लाझमा थेरपी करण्यासाठी यादी तयार केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाच हजार प्लाझ्मा दात्यांची यादी...५ हजार व्यक्तींना केले प्रोत्साहित

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढतं असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यासाठी पाच हजार प्लाझमा दात्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठविण्याचा उपक्रम नाशिक येथील भारतीय जैन संघटनेच्या वतीने हाती घेण्यात आला असून पंधरा ऑगष्ट पर्यंत मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती संघटनेचे संसथापक शांतीलाल मुथा व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर साखला यांनी दिली. 

५ हजार व्यक्तींना करणार प्रोत्साहित
कोरोना संसर्गावर तुर्त कुठलेही प्रभावी औषध नसले तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा काढून उपचार करता येत असल्याने त्यादृष्टीने कोरोना संदर्भातील भिती दुर करण्यसाठी भारतीय जैन संघटना सरसावली आहे. कोरोनावर मात करून बरे झालेल्या रुग्णांचा शोध घेवून त्यांची संमती घेवून प्लाझमा थेरपी करण्यासाठी यादी तयार केली जात आहे. प्लाझमा डोनर्स जीवनदाता योजना असे योजनेचे नाव असून प्लाझमा दान करणाऱ्या व पात्र असणाऱ्या ५ हजार व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांची संमती पत्रे मिळवून ते शासनाच्या सुपूर्द करण्याचा निर्णय जैन संघटनेने घेतला आहे. या मोहिमेला जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मालेगाव महापालिकेचे आयुक्त दीपक कासार यांचे मार्गदर्शन मिळतं आहे. 

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

संपर्कासाठी आवाहन 
सतरा वर्षा पेक्षा अधिक वय असलेल्या व कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या तसेच इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींनी भारतीय जैन संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी यतिश डुंगरवाल (९८२३६४४११४), ललित सुराणा (९३७०२६२६४३), अभय ब्रम्हेचा (७७५५९५७७७७), गोटू चोरडिया (७९७२४७५३०८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...