esakal | माडसांगवीची सूनबाई करणार प्रजासत्ताक दिनी दिल्ली पथसंचलनाचे नेतृत्व! 
sakal

बोलून बातमी शोधा

madsangvi 123.jpg

हैदराबादला २० ते २९ नोव्हेंबरला पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर झाले. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दादर हवेली, या सहा राज्यांतील दोनशे निवडक विद्यार्थी व ११ कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते.

माडसांगवीची सूनबाई करणार प्रजासत्ताक दिनी दिल्ली पथसंचलनाचे नेतृत्व! 

sakal_logo
By
योगेश मोरे

नाशिक : दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक येथील नवजीवन विधी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी तसेच माडसांगवी येथील शालिनी मनोज पेखळे-घुमरे यांची निवड झाली. 

एकूण ५६ स्वयंसेवकांची व दोन कार्यक्रम अधिकाऱ्यांची निवड
हैदराबादला २० ते २९ नोव्हेंबरला पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर झाले. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दादर हवेली, या सहा राज्यांतील दोनशे निवडक विद्यार्थी व ११ कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट नेतृत्व करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण करून घेत राज्यातील १४ विद्यार्थ्यांची गोवा येथील २ व १ कार्यक्रम अधिकारी यांची दिल्ली येथे पथसंचालनासाठी निवड झाली. त्यात, महाराष्ट्रातून २८ मुले-मुली अशा एकूण ५६ स्वयंसेवकांची व दोन कार्यक्रम अधिकाऱ्यांची निवड झाली. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश  

संघनायिका म्हणून प्रतिनिधित्व

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व नवजीवन विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी तसेच माडसांगवीच्या सुनबाई शालिनी मनोज पेखळे-घुमरे या संघात संघनायिका म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत. शालिनी मनोज पेखळे -घुमरे यांच्या यशाकरिता महाराष्ट्र व गोवाचे क्षेत्रीय संचालक माननीय कार्तिकेय, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंखे, युवा अधिकारी अजय शिंदे, पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, जिल्हा समन्वयक रवींद्र अहिरे, पुष्कर पाडेकर, डॉ. डी. के. आहेर, प्राचार्य डॉ. के. के. देव आदीचे मार्गदर्शन लाभले.  

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप